‘ते’ संकेतस्थळ सुरक्षितच
By Admin | Updated: January 20, 2017 23:50 IST2017-01-20T23:49:09+5:302017-01-20T23:50:54+5:30
बीड : जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ ‘हॅक’ झाल्याच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संबंधित संकेतस्थळ अधिकृत नसल्याचा खुलासा केला आहे.

‘ते’ संकेतस्थळ सुरक्षितच
बीड : जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ ‘हॅक’ झाल्याच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संबंधित संकेतस्थळ अधिकृत नसल्याचा खुलासा केला आहे. जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ ६६६.ुीीस्रिङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल हे सुरक्षित असल्याचे शुक्रवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ तयार झाले होते. सुरूवातीला ुीीस्रिङ्म’्रूी.ूङ्मे असे नामकरण केले होते. दोन महिन्यांपूर्वी हे संकेतस्थळ ठकउ च्या सर्व्हरवर होस्ट करण्यात आले. त्यानंतर ते ुीीस्रिङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल या नावाने सुरू झाले. सदरील संकेतस्थळाची सुरक्षा तपासणीही करण्यात आलेली आहे, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.
गुरूवारी जुन्या संकेतस्थळावर ‘हॅकड बाय टीमसीसी’ असा मजकूर झळकत होता. मात्र, हे संकेतस्थळ अधिकृत नाही, असेही श्रीधर यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी बीड पोलीस दलाशी संबंधित माहितीसाठी ६६६.ुीीस्रिङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन अधीक्षकांच्या वतीने केले. (प्रतिनिधी)