पाणंद रस्ते, स्वच्छता अभियान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 18:50 IST2018-10-21T18:48:59+5:302018-10-21T18:50:32+5:30
ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे.

पाणंद रस्ते, स्वच्छता अभियान सुरू
चित्तेपिंपळगाव : ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे, अशी माहिती डॉ. धोंडीभाऊ पाटील पुजारी यांनी येथे दिली.
पिंपळगाव पांढरी येथे समाजभान कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित पाणंद रस्ते व स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भागचंद ठोंबरे, तालुका खरेदी विक्री संचालक दत्तू ठोंबरे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस एकनाथ गवळी, सरपंच राम एरंडे, पं.स.सदस्य शुभम पिवळ, राजाराम ठोंबरे, वैजिनाथ तवार, सरपंच योगेश ठोंबरे, नाना बोंबाळे, अप्पासाहेब ठोंबरे, ज्ञानदेव ठोंबरे,उत्तम ठोंबरे,दगडू बोंबाळे, रामू बोंबाळे, सुखदेव ठोंबरे,अर्जुन सूर्यवंशी, सरपंच दीपक मोरे, सरपंच सरस्वती गवळी, भगवान तवार,चिंतामण तवार,बाळासाहेब यादव,माजी सरपंच नवनाथ कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सांजखेडा व पिंपळगाव पांढरी येथे पाणंद रस्ते, स्वच्छता अभियानास सामाजिक कार्यकर्ते डॉ. धोंडीभाऊ पाटील पुजारी यांच्या स्वखर्चातून सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत डॉ. पुजारी यांनी पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १८५ गावांत स्वखर्चातून न वेडी बाभूळ निर्मूलन, पाणंद रस्ते व गाव स्वच्छता अभियान राबविल्याचे विठ्ठलराव मुळे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण काळे, विठ्ठलराव मुळे, अमोल चिंतामणी, फिरोज पठाण, बाबासाहेब मुळे, युसूफ पठाण आदींनी परिश्रम घेतले.