वेरूळ लेणीत गार्डनसाठी पाणी; पिण्यासाठी मात्र नाही, पर्यटकांचे हाल

By Admin | Updated: December 12, 2014 00:54 IST2014-12-11T23:36:36+5:302014-12-12T00:54:55+5:30

सुनील घोडके, खुलताबाद जगप्रसिद्ध वेरुळ लेणी पाहण्यासाठी शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणात येत असून विद्यार्थ्यांच्या गर्दीने वेरुळलेणी गजबजली आहे.

Water for the Verul caves; Not only to drink, but to tourists | वेरूळ लेणीत गार्डनसाठी पाणी; पिण्यासाठी मात्र नाही, पर्यटकांचे हाल

वेरूळ लेणीत गार्डनसाठी पाणी; पिण्यासाठी मात्र नाही, पर्यटकांचे हाल

सुनील घोडके, खुलताबाद
जगप्रसिद्ध वेरुळ लेणी पाहण्यासाठी शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणात येत असून विद्यार्थ्यांच्या गर्दीने वेरुळलेणी गजबजली आहे. मात्र, या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही तर दुसरीकडे मात्र गार्डनसाठी चोवीस तास पाणी उपलब्ध असल्याने पर्यटक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
पर्यटन हंगाम सुरू झाल्याने देशी-विदेशी पर्यटकांसह शैक्षणिक सहलीमुळे लेणी परिसर गजबजला असून या परिसरात विद्यार्थी डबे खातात पण, पिण्यासाठी पाणीच नाही. लेणी परिसरात असलेल्या नळाला गेल्या आठ दिवसांपासून पाणी नाही.
पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी पर्यटकांना पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. लेणी परिसरातील एकमेव असलेल्या नळाची पाईपलाईन नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येते. आठ दिवसांत पुरातत्त्व खात्यास पाईपलाईन दुरुस्त करण्यास वेळ मिळाला नाही काय? असा सवाल पर्यटक करीत आहेत.
दुसरीकडे मात्र गार्डनसाठी पाणी चोवीस तास सुरू आहे, त्यामुळे पर्यटकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. वीस रुपयांची पाण्याची बाटली विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.
बॉम्बशोधक पथकाडून तपासणी
सध्या पर्यटकांच्या गर्दीने वेरूळ लेणी परिसरात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
त्याचबरोबर बॉम्बशोधक पथक (ग्रामीण) लेणी परिसरातील भागाची तपासणी श्वानाकडून करण्यात येत आहे. कुठल्याही घातपाती कारवाया होऊ नयेत म्हणून पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, वेरुळ लेणी पोलीस चौकीचे पो.हे.कॉ. उंबरे, रत्नपारखे लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)

Web Title: Water for the Verul caves; Not only to drink, but to tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.