शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक; शहराची तहान भागविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:43 IST

मोमबत्ता, हर्सूल सावंगी तलावाच्या पाण्याचा वापरच नाही

औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक बनते. यंदाही तशीच स्थिती असून, महापालिका प्रशासनाने मागील काही वर्षांमध्ये शहराची तहान भागविण्यासाठी कोणत्याही दीर्घकालीन उपाययोजनाच केलेल्या नाहीत. तहान लागली तर तात्पुरत्या उपाययोजनांवर दरवर्षी भर देण्यात येतो. शहरालगत असलेल्या दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव, हर्सूल सावंगी येथील पाझर तलावाच्या पाण्याचा पिण्यासाठी अजिबात वापर होत नाही. तलावातील पाण्याचे निव्वळ बाष्पीभवन होते, हे विशेष.

वाढत्या लोकसंख्येला समाधानकारक पाणी देणे, हे महापालिकेचे दायित्व आहे. १०२ टीएमसीचे धरण उशाला असल्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या पर्यायी स्रोतांचा कधीच विचार केला नाही. जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. सध्या मनपा सद्य:स्थितीत असलेल्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी तब्बल १४० कोटी रु. खर्च करीत आहे. तरीही ओरड कायम आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा खर्च मनपाला परवडणारा नाही. त्यामुळे आतापासूनच पर्यायी जलस्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे.

हर्सूल तलावाची स्थितीहर्सूल तलावाच्या पाण्यावर १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान भागवली जात होती. या तलावाचे लाभक्षेत्र परिसरात मागील ७ दशकांमध्ये वाढच केली नाही. उलट तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे दरवर्षी तलाव ओसंडून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात खाम नदीपात्रातून वाहून जाते. गाळ काढणे, लाभक्षेत्र वाढविले तर भविष्यात मोठ्या प्रमाणात शहराला फायदा होऊ शकतो.

मोमबत्ता तलावाचे पाणीदौलताबाद घाटात जि.प.च्या अखत्यारीत असलेल्या मोमबत्ता तलावातील गाळ, लाभक्षेत्र वाढवून त्यातील पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरता येऊ शकते. दौलताबाद समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर आहे. पडेगाव, भावसिंगपुरा, छावणी, रेल्वे स्टेशनपर्यंत या तलावाचे पाणी कोणत्याही पाण्याच्या मोटारी न लावता गुरुत्वाकर्षणाने देता येऊ शकते. याकडे शासन, प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.

हर्सूल सावंगी पाझर तलावहर्सूल गावापासून हाकेच्या अंतरावर हर्सूल-सावंगी पाझर तलाव आहे. या तलावाच्या पाण्याचा अजिबात वापर होत नाही. या तलावातही अनेक दशकांपासून गाळच गाठलेला नाही. ३० फूट पाणीक्षमता असलेल्या या तलावातील पाण्यावर प्रक्रिया करून नारेगाव, चिकलठाणापर्यंत देता येऊ शकते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई