पूस योजनेतून ३५ गावांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:26 IST2016-04-26T23:39:31+5:302016-04-27T00:26:42+5:30

अंबाजोगाई : पूस वीस खेडी पाणीपुरवठा योजनेतून सध्या ३५ गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

Water supply to 35 villages through Pus Yojana | पूस योजनेतून ३५ गावांना पाणीपुरवठा

पूस योजनेतून ३५ गावांना पाणीपुरवठा


अंबाजोगाई : पूस वीस खेडी पाणीपुरवठा योजनेतून सध्या ३५ गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. योजनेअंतर्गत घाटनांदूरसह ११ गावांना जलवाहिनीद्वारे तर अंबाजोगाई तालुक्यातील २४, परळी तालुक्यातील एका गावात टँकद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.
पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असतानाही पूस पाणी पुरवठा योजना अर्ध्या तालुक्याची तहान भागवित आहे. योजनेअंतर्गत असलेल्या घाटनांदूरसह दहा गावांस एक दिवसाआड बारा लक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर परळी तालुक्यातील धर्मापुरीस दररोज ८४ हजार लिटर पाणीपुरवठा टँकरद्वारे केला जातो. अंबाजोगाई तालुक्यातील पंचवीस गावास दररोज तीस टँकरद्वारे तेरा लक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तीस टँकरद्वारे पंचवीस गावात दररोज ७२ खेपा सुरू आहेत. या योजनेस नियमित वीजपुरवठा होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Water supply to 35 villages through Pus Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.