चारशे दलघमीने वाढला जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 01:12 IST2016-10-10T00:54:16+5:302016-10-10T01:12:57+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील जलसाठ्यात परतीच्या पावसाने मोठी वाढ झाली आहे. दहा दिवसांत विभागातील धरणांमधील उपयुक्त साठा तब्बल ४३२ दलघमीने वाढला आहे

चारशे दलघमीने वाढला जलसाठा
औरंगाबाद : मराठवाड्यातील जलसाठ्यात परतीच्या पावसाने मोठी वाढ झाली आहे. दहा दिवसांत विभागातील धरणांमधील उपयुक्त साठा तब्बल ४३२ दलघमीने वाढला आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ६९ % जलसाठा झाला.
मराठवाड्यातील ८५० प्रकल्पांमध्ये मागील २६ सप्टेंबर रोजी एकूण ५०१६ दलघमी इतका उपयुक्त साठा होता. या सर्व धरणांमधील उपयुक्त साठा आता ५४४८ दलघमीवर पोहोचला आहे. आठवडाभरात सर्वाधिक २१५ दलघमी वाढ ही विभागातील लघु प्रकल्पांमध्ये झाली आहे. मराठवाड्यात एकूण ७३२ लघु प्रकल्प असून, त्यामध्ये सध्या ६९ टक्के म्हणजे १३२३ दलघमी इतका उपयुक्त साठा आहे.
अकरा मोठ्या प्रकल्पांमध्येही या काळात ९९ दलघमीची भर पडली आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ३१३६ दलघमी म्हणजे ६० टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांमधील उपयुक्त साठाही ८२ दलघमीने वाढून तो आता ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या विभागातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ७५९ दलघमी इतका साठा आहे. गोदावरी नदीवरील ११ बंधारेही पावसाने तुडुंब भरले आहेत. गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये सध्या १७७ दलघमी (७७ टक्के) इतका उपयुक्त साठा झाला आहे.