शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

औरंगाबाद जिल्ह्यातील २६५ गावांना पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:43 IST

वैशाख महिना लागल्यानंतर उन्हाचा पारा चढू लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागला असून, २६५ गावांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यांत सुरू असून त्यात गंगापूर तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देवैशाख वणवा : गंगापूरमध्ये सर्वाधिक टँकर; ३०५ विहिरींचे अधिग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वैशाख महिना लागल्यानंतर उन्हाचा पारा चढू लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागला असून, २६५ गावांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यांत सुरू असून त्यात गंगापूर तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील ८७ गावांत ८९ टँकरने पाणीपुरवठा होतो आहे. ३०५ विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले असून, ३२ वाड्या आणि २६५ गावांत ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारली. कुठेही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी फुलंब्री तालुक्यातील काही गावांना भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.सर्वाधिक तहानले औरंगाबादमराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ४७२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ३६३ गावांमध्ये हा पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा सर्वाधिक तहानला आहे. २६५ गावांत ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागाची राजधानी असलेला औरंगाबाद जिल्हा सध्या पाणीटंचाईच्या झळा सोसत असल्याचे महसूलच्या आकड्यांवरून दिसते आहे. २३ एप्रिलपर्यंतची ही स्थिती असून येत्या महिन्यात यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थलांतरासारखी स्थिती नाहीजिल्ह्यामध्ये अद्याप पाण्यामुळे स्थलांतर करण्याची परिस्थिती उद्भवलेली नाही. विभागातील एकूण जिल्ह्यांपैकी औरंगाबादेत गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे डिसेंबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. पुढील महिनाअखेरीस टँकरचा आकडा ५०० पर्यंत जाईल; परंतु पाण्यामुळे स्थलांतर करावे लागेल, अशी स्थिती नसल्याचा दावा विभागीय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.तालुकानिहाय टँकर्सची स्थितीतालुका गावे टँकरऔरंगाबाद २५ ३७फुलंब्री ३७ ५३पैठण १४ २१गंगापूर ८७ ८९वैजापूर ३० ३८खुलताबाद १९ १८कन्नड १७ १५सिल्लोड ३५ ५२सोयगाव ०१ ०१एकूण २६५ ३२४

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabadऔरंगाबाद