शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या हालचाली; दूरध्वनी संदेशाद्वारे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 06:12 IST

शासनस्तरावरून दूरध्वनी संदेशाद्वारे निर्देश

स. सो. खंडाळकर

छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जायकवाडीमध्ये पाणी सोडू नका : शासनाची सूचना, अधीक्षक अभियंत्याच्या पत्राने खळबळ’ हे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त शुक्रवारी दिवसभर चर्चेत राहिले. परिणामी, शासनस्तरावरून वरच्या धरणांमधूनपाणी सोडण्याच्या हालचाली वाढल्या व तसे लेखी पत्र जारी करावे लागले. शासनस्तरावरून दूरध्वनी संदेशाद्वारे पाणी सोडण्याचे निर्देश नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी ग्वाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी पत्राद्वारे दिली.

मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीचे शिष्टमंडळ तिरमनवार यांना भेटले. या शिष्टमंडळाला दिलेल्या पत्रातही तिरमनवार यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. 

मराठा समाजाने विचारला जाब  nशुक्रवारी सकाळीच सकल मराठा समाज व  बुलंद छावाच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता स. कों. सब्बीनवार यांना घेराव घालत माफी मागण्याचा आग्रह धरला. त्यांनी माफीनामाही लिहून दिला.   

पाणी अन् आरक्षणाचा काय संबंध? : जरांगेजालना : पाण्याचा प्रश्न वेगळा असून, तो वेगळ्या पद्धतीने मांडा, मात्र त्यात मराठा आरक्षणाला आणू नका. आंदोलन बदनाम करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना कोणी दिला? पाणी आरक्षणाचा काय संबंध आहे, असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला .

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव आहे. -अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री    

टॅग्स :DamधरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी