पाणीप्रश्न तळणीपर्यंत मार्गी लागला

By Admin | Updated: March 18, 2015 00:18 IST2015-03-18T00:07:23+5:302015-03-18T00:18:00+5:30

अमोल राऊत , तळणी दे.राजा येथील खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी तळणीसह परिसरातील गावांतील नागरिकांनी एकत्रित येऊन दिलेल्या लढ्याला तब्बल अडीच महिन्यानंतर यश मिळाले.

The water problem began to float | पाणीप्रश्न तळणीपर्यंत मार्गी लागला

पाणीप्रश्न तळणीपर्यंत मार्गी लागला


अमोल राऊत , तळणी
दे.राजा येथील खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी तळणीसह परिसरातील गावांतील नागरिकांनी एकत्रित येऊन दिलेल्या लढ्याला तब्बल अडीच महिन्यानंतर यश मिळाले. तर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या रेट्यामुळे १६ मार्च रोजी खडकपूर्णा प्रकल्पातून १६.४१ क्युसेस विसर्गाने ४.२८ द.ल. घनमीटर पाणी सुटले. मात्र उस्वद-देवठाणा पर्यंत हे पाणी पोहोचणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दे.राजा येथील खडकपूर्णा प्रकल्पातून उस्वद - देवठाणापर्यंत गावांना पाणी सोडण्यासाठी प्रथम ७ जानेवारी व २ फेबु्रवारी रोजी प्रत्यक्ष पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर व विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन निवेदन देऊ न पाणी सोडण्याची मागणी के ली होती. यावेळी लोणीक र यांनी आठ दिवसांत पाणी सोडू ,असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र, पाणी सुटले नाही.
त्यामुळे २० फेबु्रवारीपासून तळणी येथील पूर्णा नदीच्या पात्रात थेट उपोषण सुरु के ले होते. उपोषणाच्या दरम्यान दुसऱ्या दिवशी सीताराम हरिदास राठोड यांची प्रकृ ती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी दहिफळ (खं) येथे हलवण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी मुरलीधर दत्तराव खंदारे, सतीश शिवाजी खंदारे, गणेश गोपाळ खंदारे, आश्रुबा वामन खंदारे, प्रभाकर नारायण खंदारे यांची प्रकृ ती गंभीर झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचे दहिफळ (खं) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. निलवर्ण यांनी पोलिसांना क ळविले.
मात्र, उपचार घेण्यास उपोषणकर्त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे चौथ्या दिवशी पोलिसांच्या मदतीने त्यातील मुरलीधर दत्तराव खंदारे, सतीश शिवाजी खंदारे, गणेश गोपाळ खंदारे, आश्रुबा वामन खंदारे, प्रभाक र नारायण खंदारे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर भगवान भीमराव खंदारे, मुरलीधर दत्तराव खंदारे, पंडित जानकीराम मोरे, सीताराम हरिदास राठोड व आश्रुबा वामन खंदारे यांची प्रकृ ती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.
१० उपोषणकर्त्यांना उपचारासाठी हलविण्यात आल्याने पुन्हा अर्जुन बालच्ांद पवार, नंदू बन्सी जाधव, विजय कन्हैयालाल राठोड, विजय राधाकि सन चौहान व कि शोर रतन राठोड (सर्व रा. लिंबखेडा) हे उपोषणाला बसलेले आहेत. पाण्यासाठी सुरु असलेल्या उपोषणाला चौथ्याही दिवशी प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे पाचव्या दिवशी महिलांही उपोषणाला बसणार असून सहाव्या दिवशी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे उपोषणाला वेगळे वळण लागू नये म्हणून भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने सहाव्या दिवशी सक ाळी ११ वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांची भेट घेऊ न १ मार्चला पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार उपोषण मागे घेण्यात आले होते.
पालकमंत्री बबनराव लोणीकरांनी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आदेश दिल्याने तर देऊ ळगाव येथील शेतक ऱ्यांनी व पाणी बचाव समितीने तहसीलदार व कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे पाणी सोडण्यास विरोध के ल्याने पाण्यासाठी मराठवाडा - विदर्भ वाद सुरु झाला होता. १२ मार्च उलटला तरीही पाणी सोडण्यास टाळाटाळ के ली जात असल्याने व लोणीक रांनी पाणी सोडण्याचे आदेश देऊनही पाणी सुटत नसल्याने अखेर निराश झालेले उपोषणक र्ते कै लास खंदारे व ज्ञानेश्वर राठोड यांनी २० मार्च रोजी थेट पूर्णा नदीच्या पुलावरु न उडी मारु न आत्मदहन क रण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मात्र, पाणी सोडण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री लोणीकर यांनी केली. पाणी सोडण्यात आले असले तरी विर्दभातील कि नगाव वायाळ, दुसरबीड, देवखड ही कोल्हापुरी बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मराठवाड्यातील वझर सरकटे, वाघाळा, तळणी व उस्वद-देवठाणापर्यंत पाणी पोहोचणार का ? अशाही प्रश्न अनेक ांना पडला आहे.
याबाबत आंदोलनकर्ते कैलास खंदारे व ज्ञानेश्वर राठोड म्हणाले, पाण्यासाठी प्रामाणिक के लेले प्रयत्न, उपोषणला वाढता पाठिंबा, पालकमंत्री लोणीकरांचा रेटा व ‘लोकमत’ ने या प्रश्नाला वाचा फोडल्याने पाणीप्रश्न मार्गी लागला, असे सांगितले.
४या बाबत खडकपूर्णा प्रकल्पाचे शाखा अभियंता पी. एस. सानप म्हणाले की, खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र, हे पाणी उस्वद-देवठाणा पर्यंत पाणी पोहोचेल का? हे सांगणे कठीण आहे. ८ द. ल. घनमीटर पाणी सुटले असते तर पाणी पोहोचले असते, असा अंदाज व्यक्त के ला.
४तळणी क ोल्हापुरी बंधाऱ्यांचे बीट प्रमुख एम. डब्ल्यू चंडालिया म्हणाले की, ४.२८ द.ल.घनमीटर पाणी पूर्ण सोडल्यानंतर दोन दिवसांत तळणी येथील बंधाऱ्यात पाणी पोहोचेल. पूर्ण भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी उस्वद-देवठाणा पर्यंत पाणी पोहोचेल, असे सांगितले.
४विर्दभातील कि नगाव वायाळ, दुसरबीड, देवखेड या क ोल्हापुरी बधाऱ्यांची प्रक ल्पीय पाणी साठवण क्षमता २. ५० द.ल.घ.मी. इतक ी आहे. वझर सरक टे येथील क ोल्हापुरी १.५० द.ल.घ.मी. इतक ी आहे. तर तळणी येथील क ोल्हापुरी बधाऱ्यांची प्रकल्पीय पाणी साठवण क्षमता २.०४ द.ल.घ.मी. इतकी आहे. म्हणजेच ६.०४ द.ल.घ.मी. इतकी आवश्यक असताना फ क्त ४.२८ द.ल.घनमीटर पाणी सोडण्यात आल्याने उस्वद-देवठाणापर्यंत क से पोहोचणार ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The water problem began to float

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.