ग्रामस्तरावर आता होणार पाण्याचे व्यवस्थापन
By Admin | Updated: June 27, 2014 00:12 IST2014-06-26T23:23:36+5:302014-06-27T00:12:03+5:30
अहमदपूर : ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापक सुरळीत होण्यासाठी ग्रामस्तरावर आता पाणी साठवा गाव वाचवा अभियान राबविण्यात येत आहे़

ग्रामस्तरावर आता होणार पाण्याचे व्यवस्थापन
अहमदपूर : ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापक सुरळीत होण्यासाठी ग्रामस्तरावर आता पाणी साठवा गाव वाचवा अभियान राबविण्यात येत असून या अभियानामुळे पाण्याच्या संवर्धणात मोठी वाढ होणार आहे़
ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईला सामोरो जावे लागत आहे़ ही दृरदृष्टी लक्षात घेवून शासनाच्या वतीने राज्यातील पाणी साठवण व त्याचा भविष्यातील समान वापर तंत्रशुध्द पध्दतीने केल्यास ग्रामीण भागांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही़ त्यामुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे़ ग्रामीणभागात पडलेल्या पावसाचा प्रत्येक थंब जमिनीत मुरवीण्यासाठी आणी पर्यावरण संतूलन राखण्यासाठी शासनाच्या वतीने हा आदर्श उपक्रम सुरू केला आहे़
पाणी व्यवस्थापना संदर्भात कार्यक्रम आखुन त्यामध्ये शासनाच्या विविध विभागाच्या योजनाचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी गावपातळीवर सन यंत्रण व्यवस्था निर्माण करण्यात यावी यासाठी मातीची पाणी धरूण ठेवण्याची क्षमता खडकाची पाणी पाझर क्षमता व साठवण्याची क्षमता व इतर तांत्रीक बाबी पाणी मुरण्याची क्षमता निश्चिी करून नियोजन करण्यात येणार आहे़ त्यानुसार ग्रामपंचायत आणि ग्रामीण क्षेत्रातील भुजल पातळीचे परीक्षण आणि सर्वेक्षेण करण्यात येणार आहे़
सदरील अभियान यशस्वी करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने अंतर्गत ६० ते ४० या प्रमाणात बसणारे जल संधारण विभागच्या राष्ट्रीय पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत नियोजन करण्यात येणार आहे़
हे अभियान राबविण्यासाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरीय सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहेत़ यामध्ये ग्रामविकास मंत्री, राज्यमंत्री, अप्पर मुख्य सचिव, आयुक्त, कृषी आयुक्त पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय सदस्य यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे़ (वार्ताहर)
याबाबत अहमदपूरचे गटविकास अधिकारी नितीन दाताळ यांच्याशी संपर्क साधला असता राज्यातील ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापना मधील पाणी साठवा गाव वाचवा अभियानात अहमदपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग सक्तीचा करून सदरील योजना यशस्वीपणे राबविणार असल्याचे सांगीतले़