लघूप्रकल्पांमधील पाणीपातळी घटली
By Admin | Updated: June 21, 2014 00:57 IST2014-06-20T23:50:50+5:302014-06-21T00:57:44+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील २६ लघूप्रकल्पांमधील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. १२ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी असून १४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणी आहे.
लघूप्रकल्पांमधील पाणीपातळी घटली
हिंगोली : जिल्ह्यातील २६ लघूप्रकल्पांमधील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. १२ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी असून १४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणी आहे.
जून महिना मध्यापर्यंत आला तरी जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. अशातच गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात तापमान वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झाले. परिणामी तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. जिल्ह्यात पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत एकुण २६ लघूप्रकल्प येतात. त्यापैकी हिंगोली तालुक्यातील चोरजवळा, वडद, सवड, हिरडी, हादगाव, सेनगाव तालुक्यातील पिंप्री, बाभुळगाव, औंढा तालुक्यातील मरसूळ, वाळकी, सेंदुरसना, केळी, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी या १२ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
तसेच हिंगोली तालुक्यातील पारोळा तलावात १४ टक्के, पेडगाव तलावात २२ टक्के, सवना तलावात ७ टक्के, घोरदरी तलावात २२ टक्के, सुरेगाव तलावात ७ टक्के, पुरजळ तलावात ६ टक्के, वंजारवाडी तलावात १९ टक्के, पिंपळदरी तलावात २१ टक्के, बोथी तलावात २० टक्के, दांडेगाव तलावात ३ टक्के, देवधरी तलावात ३ टक्के तर राजवाडी तलावात १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
वेळेवर पाऊस न पडल्यास हा पाणीसाठाही कमी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झाले
पूर्णा पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील २६ लघूप्रकल्पांपैकी १२ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली तर १४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा.
सर्वाधिक म्हणजे २२ टक्के पाणीसाठा सेनगाव तालुक्यातील घोरदरी तलावात उपलब्ध.
वडद, चोरजवळा, सवड, हिरडी, हादगाव, पिंप्री, बाभुळगाव, मरसूळ, वाळकी, सेंदुरसना, काकडदाभा, बोथी तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने झाली घट.
आठवडाभरापूर्वी केवळ ६ लघूप्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणीसाठा होता उपलब्ध.