प्रकल्पातून पाणी गळती
By Admin | Updated: January 31, 2017 23:31 IST2017-01-31T23:25:59+5:302017-01-31T23:31:41+5:30
आष्टी : गेल्या चार वर्षांपासुन पाऊस नसल्यामुळे कोरडा असलेला प्रकल्प यंदाच्या पाऊसाने पूर्णपणे भरला आहे.

प्रकल्पातून पाणी गळती
आष्टी : गेल्या चार वर्षांपासुन पाऊस नसल्यामुळे कोरडा असलेला प्रकल्प यंदाच्या पाऊसाने पूर्णपणे भरला आहे. मात्र प्रकल्पाच्या भिंतीतून पाण्याची धार सुरू झाली असून, हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहणी केली असता दिसून आला आहे.
आष्टी तालुक्यातील सर्वांत मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या रुटी ईमणगाव प्रकल्प यंदा झालेल्या दमदार पाऊसाने गच्च भरला आहे. मात्र, ६० ते ७० वर्षांपूर्वीच्या प्रकल्पातील सांडव्याच्या परिसरातील भिंती अत्यंत खिळखिळ्या झाल्या आहेत. दरवाजाच्या उजव्या कोपऱ्याच्या भिंतीच्या तळाला भले मोठे भगदाड पडल्याने दररोज लाखो लिटर पाणी सध्या वाया चालले आहे. या प्रकाराकडे सध्या कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे हा प्रकल्प फुटून मोठे नुकसान होण्याची भीती धरण परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. (वार्ताहर)