वीज बिलाप्रमाणे दरमहा पाणीपट्टी
By Admin | Updated: August 18, 2014 00:37 IST2014-08-18T00:25:24+5:302014-08-18T00:37:32+5:30
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी लि. या कंत्राटदार संस्थेकडे योजनेचे काम २० वर्षांसाठी देण्यात आले

वीज बिलाप्रमाणे दरमहा पाणीपट्टी
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी लि. या कंत्राटदार संस्थेकडे योजनेचे काम २० वर्षांसाठी देण्यात आले असून, कंपनी दरमहा वीज बिलाप्रमाणे पाणीपट्टी वसूल करणार आहे. सध्या ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी आहे. यातील १८०० रुपये मनपाला, तर १२०० रुपये कंपनीच्या खात्यावर जमा होणार असल्याचा दावा शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी केला. योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी १० टक्के पाणीपट्टी वाढेल. त्यानंतर दर तीन वर्षांनी कंपनी २५ टक्के पाणीपट्टीत वाढ करील. जे ग्राहक जास्त पाणी वापरतील त्यांना जास्त पाणीपट्टी येईल. १ सप्टेंबर २०१५ पासून नळाला मीटर बसविण्याचे काम सुरू होईल.
कंत्राटदार काय करणार
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी लि.कडे कंत्राट आहे. गळती दुरुस्त्या, पाणीपट्टी वसुली, पाणीपुरवठा करणे, मीटर बसविणे. पीपीपी मॉडेलवर योजनेचे काम होईल. २० वर्षांचा करार, १७ वर्षे देखभाल, दुरुस्ती करणार. वर्षातून तीन वेळेस काम पाहून मनपा निधी देणार.
सध्या ४० अभियंते नेमले आहेत. ५० इतर कर्मचारी, ३ इतर कंत्राटदार नेमले आहेत. गुंठेवारी वसाहतींसाठी टँकर धोरण ३ दिवसांत ठरणार आहे. सहा ठिकाणी ग्राहक तक्रार केंद्र उघडणार. जायकवाडीत मुख्यालय बांधणार, २००० मि. मी. व्यासाची २७ कि़ मी. जलवाहिनी टाकणार, १९२ एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणार, १७ नवीन जलकुंभ बांधणार, हर्सूल तलावाचे नूतनीकरण, १२८९ कि़ मी. नवीन जलवाहिन्या शहरात टाकणार. कंपनी १७ व्यवस्थापकीय कर्मचारी नेमेल. ६४ अभियंते, ४० सुपरवायझर, लाईनमन १७७, मनपाचे ३०० कर्मचारी कंपनीकडे असतील. ०२४०-६६५५००० या क्रमांकावर ग्राहकांना तक्रार करता येईल.