काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू

By संतोष हिरेमठ | Updated: September 19, 2022 21:10 IST2022-09-19T21:10:31+5:302022-09-19T21:10:53+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Watch out, two more deaths from swine flu in Aurangabad | काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू

काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात स्वाइन फ्लूने आणखी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यातील एका रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला. तर एका रुग्णाच्या मृत्यू झाल्याची माहिती तब्बल १० दिवसांंनंतर समोर आली.  

चितेपिंपळगाव येथील ५५ वर्षीय महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर ९ सप्टेंबर रोजी चिकलठाणा परिसरातील एका ५४ वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Watch out, two more deaths from swine flu in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.