फारोळ्यात लाखो लिटर पाणी वाया

By Admin | Updated: June 25, 2014 01:27 IST2014-06-25T01:15:39+5:302014-06-25T01:27:46+5:30

चितेगाव : फारोळा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळील मनपाच्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून रोज लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहून जात असून ही नदी दुथडी भरून वाहत आहे.

Waste of millions of liters of water in the Farro | फारोळ्यात लाखो लिटर पाणी वाया

फारोळ्यात लाखो लिटर पाणी वाया

चितेगाव : फारोळा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळील मनपाच्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून रोज लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहून जात असून ही नदी दुथडी भरून वाहत आहे. याकडे मनपाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
जायकवाडी प्रकल्पात ५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून मनपा पाणीटंचाई असल्याने शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करते; परंतु मनपाच्या जलवाहिनीतून रोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र फारोळा ते औरंगाबादपर्यंत दिसून येत आहे. फारोळा ते म्हारोळा या नदीजवळ जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला मोठे भगदाड पडल्याने ही नदी दुथडी भरून वाहू लागली. या पाण्यावर शेतकऱ्यांच्या अनेक विहिरी तुडुंब भरल्या असून तीन ते चार कि़मी. पाणी वाहत आहे.
यावर फारोळा येथील १० ते १२ वीटभट्टयांसाठी हे पाणी सर्रास वापरले जाते. या नदी पात्राजवळ नव्याने खोदकाम करण्यात येत असलेल्या विहिरींना भरमसाठ पाणी लागले आहे. नदीजवळील अनेक विहिरींवरून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यामुळे टँकरवाल्यांची चांदी होत आहे. हे पाणी जवळील कारखाने, बांधकाम व शेतीसाठी वापरले जाते. शुद्धीकरण होऊन आलेल्या पाण्याची मोठी नासाडी होत असून ५० एच.पी. पर्यंत पाणी वाहून जात आहे. नदीकाठावरील पाचशे हेक्टर जमीन या पाण्यामुळे ओलिताखाली आली, तर म्हारोळा गावाजवळील कृषी विभागाचा साखळी बंधारा तुडुंब भरला. या व्हॉल्व्हमधून येणाऱ्या पाण्यावर लोडिंग रिक्षा व टँकरवाले पाणी विक्री करीत आहेत. सर्वत्र विहिरी कोरड्या पडल्या असून या नदीवरील विहिरींना मात्र मुबलक पाणी आले. याचे संशोधन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
अधिकारी रोज या रस्त्याने ये-जा करतात; परंतु त्यांना फारोळा, चितेगाव, ब्रुकबाँड तांडा, गेवराई, तांडा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी या सर्व ठिकाणी तीनच्या वर एच.पी. विद्युत मोटार चालेल एवढे पाणी दिवस-रात्र चोरी होत असताना दिसत नाही. (वार्ताहर)

Web Title: Waste of millions of liters of water in the Farro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.