शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

औरंगाबाद शहराचा कचरा ९० टनाने वाढला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:21 IST

कचरा उचलण्यासाठी कंपनीला दरमहा २ कोटी

ठळक मुद्देनागरिकांचे खिसेही रिकामे स्वच्छता कराशिवाय उपभोक्ता कर

औरंगाबाद : शहरातील नऊपैकी आठ झोनमध्ये कचरा उचलण्याचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी ही खाजगी कंपनी करीत आहे. कंपनी दररोज तब्बल ३९० टन कचरा उचलत असल्याची अतिशयोक्तीपूर्ण बाब समोर आली. शहरात आतापर्यंत फक्त ३०० टन कचरा जमा होत होता. हा कचरा उचलण्यासाठी कंपनी मनपाकडून दरमहा २ कोटी रुपये वसूल करते. प्रशासनानेही कचऱ्याच्या नावावर नागरिकांकडून दरवर्षी १० कोटी रुपये वसूल करण्याची तयारी सुरू केली आहे.  औरंगाबादकर मालमत्ताकरासोबत स्वच्छता कर भरतात. तरीही मनपा हा वेगळा कर आकारणार आहे.

शहरातील कचरा संकलनाचे काम रेड्डी कंपनी करीत आहे. १ टन कचरा कंपनीने जमा करून चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर नेल्यास मनपा १६६२ रुपये देत आहे. मनपाच्या नऊपैकी आठ झोनमध्ये कंपनी कचरा जमा करीत आहे. झोन क्रमांक सहामध्ये कंपनीने कामच सुरू केले नाही. अवघ्या आठ झोनचा कचरा ३९० टन होत असल्याची माहिती  मनपा अधिकाऱ्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली. कंपनीचे दररोजचे बिल ६ लाख ४८ हजार १८० रुपये होत आहे. महिनाभराचे कंपनीचे बिल १ कोटी ९५ लाख  ४५ हजार ४०० रुपये होत आहे. कंपनी कचऱ्यामध्ये दगड, विटा, बांधकाम साहित्य टाकून बिल वसूल करीत असल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन अजिबात लक्ष देण्यास तयार नाही.

नियमबाह्य कामकंपनीने शहरातील २ लाख ३० हजार मालमत्ताधारकांकडून दररोज ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करावा, असा करारच के लेला आहे. कंपनी प्रत्येक वसाहतीमधील चौकात साचलेला कचरा जमा करीत आहे. डोअर टू डोअर कलेक्शन अजिबात नाही. दरवर्षी कंपनी मनपाकडून २४ ते २५ कोटी रुपये वसूल करीत आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहरात जिकडे तिकडे कचऱ्याचे डोंगर दिसून येत आहेत.

नागरिकांवर उपभोक्ता कचऱ्याचा बोजा रेड्डी कंपनीचा खर्च भागविण्यासाठी मनपाने नागरिकांवर उपभोक्ता कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील २ लाख ३० हजार निवासी, २५ हजार व्यापारी मालमत्ताधारकांडून दरवर्षी १० कोटी रुपये कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या वसुलीसाठी स्वतंत्र खाजगी कंत्राटदार देण्यात येणार आहे. यासाठी मनपाने आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा काढली होती. या निविदा प्रक्रियेला एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा आठ दिवसांची अल्प निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

काय आहे निविदेतनिविदेनुसार शहरातील डोअर टू डोअर कचरा संकलनावर २ लाख ३० हजार निवासी मालमत्तांकडून दरमहा ३० रुपये उपभोक्ता कर वसूल केला जाणार आहे. यातून ७ कोटी ९२ लाख रुपये तर २५ हजार व्यावसायिक मालमत्तांकडून व्यवसायानुरूप ६० ते ३०० रुपयांपर्यंत  दरमहा शुल्क आकारून त्यातून १ कोटी ८० लाख रुपये वसुलीचे टार्गेट आहे. ६० टक्के वसुली झाली तरी दरवर्षी ६ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत येतील, अशी अपेक्षा आहे. 

स्वच्छता कराशिवाय उपभोक्ता करशहरातील मालमत्ताधारक दरवर्षी मनपाला मालमत्ताकर भरतात. या करासोबत मनपा स्वच्छता करही वसूल करते. आता कचरा घेणाऱ्या कंपनीसाठी स्वतंत्र उपभोक्ता कर वसूल करण्यात येणार आहे. इंदूर महापालिका नागरिकांकडून दररोज १ रुपया वसूल करते. त्यामुळे औरंगाबाद मनपानेही अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद