शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा रुग्णालय झोपेत बांधले का? ‘MRI’,‘कॅथलॅब’साठी जागाच नाही!

By संतोष हिरेमठ | Updated: November 17, 2025 17:15 IST

८ वर्षांपूर्वीच रुग्णसेवेत दाखल रुग्णालयाची अवस्था; रुग्णालयाचा विस्तार आता अशक्य असल्याचे आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

छत्रपती संभाजीनगर : बुलडाणा जिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय’ मशीन आहे. बीड जिल्हा रुग्णालयात ‘कॅथलॅब’ असून, येथे अँजिओग्राफीलाही सुरुवात झाली आहे. मात्र, अवघ्या ८ वर्षांपूर्वी रुग्णसेवेत दाखल झालेल्या छत्रपती संभाजीनगरातील २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आता ‘एमआरआय’ आणि ‘कॅथलॅब’साठी जागाच नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णालय बांधताना या सुविधेचा विचार का करण्यात आला नाही, रुग्णालयाचे बांधकाम झोपेत केले का, अशी ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.

चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ऑक्टोबर २०१७ मध्ये रुग्णसेवेत दाखल झाले. या ठिकाणी सोनोग्राफी, सीटी स्कॅनसह विविध आरोग्य सेवा आहेत. ओपीडीसह विविध विभागांतील उपचारांसाठी एकही रुपयाचेही शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, राज्यभरातील शासकीय रुग्णालयात सुविधा वाढत होत असताना या रुग्णालयाचा विस्तार आता अशक्य असल्याचे आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘एमआरआय’ मशीन बसविण्यासाठी रुग्णालयात जागेची चाचपणी करण्यात आली; परंतु त्यासाठी पुरेशी जागा नसल्याने ही सुविधा सुरू होणे असल्याचे सांगण्यात आले. ‘कॅथलॅब’ही जागेअभावी शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या दोन सुविधांसाठी गोरगरीब रुग्णांना घाटी रुग्णालयाचाच रस्ता धरावा लागत आहे. परिणामी, घाटी रुग्णालयावर रुग्णांच्या भारवाढीलाच हातभार लागत आहे.

३८ कोटींचा खर्चजिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत ही ३८ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आली. २०१२ मध्ये रुग्णालयाचे काम सुरू झाले होते. या ठिकाणी २०१७ मध्ये रुग्णसेवा सुरू झाली.

२०२२ मध्ये निर्णय; पण..राज्य शासनाने २०२२ मध्ये आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये कार्डियाक कॅथलॅब उभारणीचा निर्णय घेतला. राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कॅथलॅब करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यात छत्रपती संभाजीनगरचाही समावेश आहे; परंतु आता सुविधेसाठी जागा नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

महिला रुग्णालयात ‘एमआरआय’ची सुविधाजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय’, ‘कॅथलॅब’ची सुविधा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या सेवा येथे सुरू होणे शक्य नाही. दूध डेअरी येथील महिला रुग्णालयात ‘एमआरआय’ची सुविधा होईल.- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Hospital Lacks Space for Key Facilities: Poor Planning?

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's district hospital, despite being recently built, lacks space for MRI and Cath lab facilities. Patients are forced to go to other hospitals, increasing their burden. Officials cite space constraints, raising questions about the hospital's initial planning.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरdoctorडॉक्टर