शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहांत प्रवेश हवाय; मग, अर्ज केला का ?

By विजय सरवदे | Updated: July 11, 2024 14:26 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ शासकीय वसतिगृहे आहेत

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १९ वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांत १२ वीनंतर पुढील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तथापि, या वसतिगृहांत गुणवत्तेनुसारच प्रवेश दिले जाणार असून प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजन, निर्वाहभत्ता आणि अभ्यासक्रमाचे साहित्य दिले जाणार आहे.

समाजकल्याण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या इयत्ता ८वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच १२ नंतर पदव्युत्तरपर्यंत पारंपरिक अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. छत्रपती संभाजीनगर शहरांसह जिल्ह्यात १९ शासकीय वसतिगृहे आहेत. यामध्ये मुलांचे ११ आणि मुलींसाठी ८ वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दुसरीकडे, सध्या विधानसभेच्या अधिवेशनात शासकीय वसतिगृहांत राबविण्यात येणाऱ्या ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया गाजत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पारदर्शीपणे राबविली जात नसल्याचा आरोप माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या ८वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गेल्या महिन्यातील २९ तारखेपर्यंत आटोपली असून आता १२ वीच्या पुढे पारंपरिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात व्यवसाय अभ्यासक्रमासाठी वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे यांनी सांगितले.

३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रियाशहरात किलेअर्क येथील इमारतीत प्रत्येेकी २५० क्षमतेचे वसतिगृहांचे चार युनिट असून यामध्ये एकूण १००० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय शहरात मुलांचे संत तुकाराम, मिलिंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जुने व नवीन अशी चार वसतिगृहे कार्यरत आहेत, तर मुलींसाठी शहरात २५० प्रवेश क्षमतेचे एक वसतिगृह व अन्य दोन वसतिगृहे असून ग्रामीण भागात मुलांसाठी वैजापूर, पैठण आणि कन्नड येथे तसेच मुलींसाठी कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर व वाळूज येथील वसतिगृहांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण