अंगावर भिंत कोसळ्याने दोघे ठार; कन्नड तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 07:36 PM2021-07-27T19:36:02+5:302021-07-27T19:36:39+5:30

तालुक्यातील चिकलठाण येथील घटना

The wall collapsed on them, killing them both; Incidents in Kannada taluka | अंगावर भिंत कोसळ्याने दोघे ठार; कन्नड तालुक्यातील घटना

अंगावर भिंत कोसळ्याने दोघे ठार; कन्नड तालुक्यातील घटना

googlenewsNext

कन्नड ( औरंगाबाद ) :  अंगावर भिंत पडल्याने दोन जण ठार झाल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील चिकलठाण येथे मंगळवारी दुपारी घडली. जब्बारशहा मन्नुशहा (४५) व संजय शेकु सोनवणे (४५ ) अशी मृतांची नवे आहेत. 

चिकलठाण येथे सुभाष बोरसे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या भिंतीचे बांधकाम नुकतेच झालेले आहे. मंगळवारी दुपारी सोसाटयाचा वारा सुटला होता. यानंतर अचानक भिंत कोसळली. भिंतीलगत लाकडी बाकावर बसलेले जब्बारशहा मन्नुशहा (४५) व संजय शेकु सोनवणे (४५, दोघेही रा चिकलठाण ) यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. जखर्मीना कन्नडच्या खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचीही प्राणज्योत मालवली.

Web Title: The wall collapsed on them, killing them both; Incidents in Kannada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.