नवीन वसाहतींना जलवाहिनीची प्रतीक्षा

By Admin | Updated: February 15, 2016 00:11 IST2016-02-14T23:56:09+5:302016-02-15T00:11:26+5:30

जालना : शहराचा विस्तार गत काही वर्षांत झपाट्याने होत आहे. काही वसाहतींमध्ये पाण्याचा सुकाळ तर ११ पेक्षा अधिक वसाहतींमधील नागरिकांना

Waiting for water for new colonies | नवीन वसाहतींना जलवाहिनीची प्रतीक्षा

नवीन वसाहतींना जलवाहिनीची प्रतीक्षा


जालना : शहराचा विस्तार गत काही वर्षांत झपाट्याने होत आहे. काही वसाहतींमध्ये पाण्याचा सुकाळ तर ११ पेक्षा अधिक वसाहतींमधील नागरिकांना गत पंधरा ते वीस वर्षांपासून पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. नगर पालिका नवीन वसाहतील जलवाहिनी कधी करणार असा सवाल उपस्थित होत आहे. आगामी उन्हाळ्यात नवीन वसाहतींमधील रहिवाशांचे तोंडचे पाणी पळणार हे मात्र नक्की.
नवीन जालना भागास घाणेवाडी जलाशयातून तर जुना जालना भागात जायकवाडी जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. वसाहती तयार होऊन पंधरा ते वीस वर्षे झाली. मात्र येथील रहिवाशांना उन्हाळ्यासोबतच बारमही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नवीन वसाहतीमधील नागरिक मतदानाच हक्क बजावतात. मात्र येथील रहिवाशांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागते. उन्हाळाची चाहूल लागताच या वसाहतींमधील रहिवाशांमध्ये पाणीटंचाईची धास्त निर्माण होते. नगर पालिकेकडून पाणीपुवठ्याचे कोणतेच नियोजन या प्रभागांमध्ये नसल्याने सर्वांची दमछाक होत असल्याचे नारिकांचे म्हणणे आहे. शहरातील चंदनझिरा भागातील आंनदीस्वामी कॉलनी, सिद्धीविनायक नगर, सुंदरनगर, सिद्धार्थ नगर, भगवान नगर, सटवाई तांडा परिसर, राजूपत वाडी, नॅशनल नगर, गायत्री नगर, योगेश नगर, म्हाडा कॉलनी आदी भागात अनेक वर्षे लोटली तरी जलवाहिनीचा पत्ता नाही. येथील नागरिकांच्या गत अनेक वर्षांपासून जलवाहिनी तसेच नळांसाठी पाठपुरावा सुरू आहे.
प्रत्यक्षात जलवाहिनी अंथरून मुबलक पाणी कधी मिळेल याची चातकासारखी प्रतीक्षा येथील रहिवाशांना आहे.
या भागात जलवाहिनी नसल्याने बारामही टँकरचे पाणी अथवा विहिरी, कूपनलिका यावरच अवलंबून रहावे लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पालिकेने एक विशेष बाब म्हणून परिसरात तात्पुरत्या स्वरूपात का होईना जलवाहिनी अंथरावी, अशी मागणी सर्वच ठिकाणच्या रहिवशांतून होत आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for water for new colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.