शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

आज प्रतीक्षा संपणाऱ़़

By admin | Updated: May 16, 2014 00:17 IST

नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या महिनाभरानंतर शिगेला पोहोचलेली निकालाची उत्सुकता शुक्रवारी संपणार आहे़

नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या महिनाभरानंतर शिगेला पोहोचलेली निकालाची उत्सुकता शुक्रवारी संपणार आहे़ नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अशोकराव चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीचे डी़ बी़ पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे़ या मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे़ शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान इमारतीत मोठ्या बंदोबस्तात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे़ प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या २० ते २४ फेर्‍या होणार आहेत़ यावेळी मतमोजणीसाठी १४ टेबल राहणार आहेत़ एका फेरीत १४ मतदान केंद्रावरील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे़ तंत्रनिकेतन महाविद्यालयामधील माहिती तंत्रज्ञान इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर मतमोजणी होणार आहे़ त्यात तळमजल्यावर भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघाची आणि पहिल्या मजल्यावर नायगाव, देगलूर व मुखेड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे़ यात प्रारंभी सकाळी ८ वाजेपासून टपाली मतपत्रिकेची मोजणी चार टेबलवर आहे़ मतमोजणीसाठी १०२ पर्यवेक्षक, १०२ मतमोजणी सहायक, १२५ सुक्ष्मनिरीक्षक आणि ३०० इतर अधिकारी-कर्मचारी असे एकूण ६३० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार हेही स्वत: लक्ष ठेवून राहणार आहेत़ या मतमोजणी प्रक्रियेची राऊंडनिहाय माहिती लाऊडस्पीकरद्वारे घोषीत करण्यात येणार आहे़ लॉ कॉलेज, नवा मोंढा रस्ता, आनंदनगर रस्ता आणि महात्मा फुले शाळा येथे लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच मतमोजणीबाबत नांदेड एफ एम रेडिओवरही माहिती दिली जाणार असून स्थानिक केबल वाहिनीवर स्ट्रीपद्वारे फेरीनिहाय मतमोजणी प्रसारित करण्यात येईल़ (प्रतिनिधी) निकाल वेबसाईटवरही मतमोजणीचा निकाल तातडीने सर्वांपर्यंत पोहचावा यासाठी राष्ट्रीय सुचना केंद्र अर्थात् एनआयसीच्या माध्यमातून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातच्या ६६६.ल्लंल्लीि.िॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर मतमोजणीची फेरनिहाय माहिती क्षणाक्षणाला अपडेट केली जाणार आहे़ यासाठी एनआयसीच्या प्रमुख भुसारी यांच्यासह त्यांची यंत्रणा सज्ज झाली आहे़ लोकसभा निवडणूकीत जिल्हा निवडणूक यंत्रणेने माहिती तंत्रज्ञानाद्वारे अनेक उपक्रम राबवले आहेत़