दोन तालुक्यांना माती परिक्षणाची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 18, 2015 00:41 IST2015-02-18T00:36:09+5:302015-02-18T00:41:40+5:30
उस्मानाबाद : जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते. जिल्ह्यातील ११२ गावांची जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणीसाठी निवड करण्यात आली होती.

दोन तालुक्यांना माती परिक्षणाची प्रतीक्षा
उस्मानाबाद : जमिनीचा कस पाहून पिके घेतली तर उत्पादन क्षमता वाढविता येऊ शकते. जिल्ह्यातील ११२ गावांची जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणीसाठी निवड करण्यात आली होती. यात ६९ गावांतील ४ हजार ६२८ माती नमुन्यांची तपासणी केली. तर परंडा, व कळंब या दोन तालुक्यातील माती नुमन्यांची तपासणी करण्यात आलेली नाही.
मानवी आरोग्याला जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलिकडील काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जमिनीची उत्पादकता अनेक कारणांमुळे कमी होत आहे. कृषी विभागाद्वारा नत्र, स्फूरद, पलाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक आदी घटकांचे प्रमाण ठरवून दिले जाते. त्यामुळे जमिनीचा कस वाढून उत्पादन वाढविता येते. शेतकऱ्यांसाठी हे परीक्षण फायदेशीर ठरते.
वास्तविकता माती परीक्षण केल्यानंतरच शेती करणे गरजेचे झाले आहे. मातीचे तीन टप्प्यात तर पाण्याच्या नमुन्यांचे एकाच टप्प्यात परीक्षण केले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यात ११२ गावांचा समावेश आहे. सन २0१४-१५ या वषार्साठी ११२ गावांतील ६, ८८३ माती नमुन्यांचे परीक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाने परीक्षणासाठी पाठविलेल्या ४, ६२८ नमुन्यांचे परीक्षण केले. मात्र, परंडा व कळंब या दोन तालुक्यातील एकाही गावातील माती नुमन्यांचे विश्लेषण पुर्ण झाले नाही. ते मार्च महिन्यामध्ये पुर्ण करण्यात येईल, असे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यातील मातीमध्ये १६ घटक आढळून येतात. मुख्य अन्न घटक नत्र, स्फुरद, पालाश, तर दुय्यम घटकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आदींचा समावेश असतो. सुक्ष्म अन्नघटकामध्ये लोह, मंगल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम व बोरॉन, नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारे अन्नघटकामध्ये कार्बन, हायड्रोजन, आॅक्सिजन व क्लोरीन असे सोळा घटक मातीमध्ये असतात. कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर शेतामधील पाणी, मातीत पानांचे परीक्षण महत्वाचे आहे.