विद्युतीकरणाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:10 AM2018-04-16T01:10:01+5:302018-04-16T01:10:39+5:30

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्यापही विद्युतीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

Waiting for electrification | विद्युतीकरणाची प्रतीक्षाच

विद्युतीकरणाची प्रतीक्षाच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणही करण्यात आले; परंतु अद्यापही विद्युतीकरणाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा कायम
आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी २० डिसेंबर २०१७ रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनची पाहणी केली. यावेळी नांदेड विभागातील रेल्वेमार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असून, विद्युतीकरणाच्या कामाने इंजिन नादुरुस्तीच्या घटनांना कायमस्वरुपी आळा बसेल, असे ते म्हणाले.
यानंतर विद्युतीकरणाच्या कामासाठी १२ जानेवारीपासून नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. यात रेल्वे पूल, लेव्हल क्रॉसिंग (भुयारी मार्ग), वळण, सिग्नल, पॉइंट अ‍ॅण्ड क्रॉसिंग आदींविषयी माहिती गोळा करण्यात आली.
नांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनेनंतर रेल्वेची वाहतूक ठप्प होते. इंजिन दुरुस्त होणे अथवा दुसरे इंजिन येण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे तासन्तास रेल्वे वाहतूक खोळंबते. शनिवारी याच अनुभवाला प्रवाशांना पुन्हा एकदा सामोरे जावे लागले. गेल्या अनेक वर्षांपासून दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची मागणी आहे. एप्रिलपासून एके री मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू होईल, असे सांगण्यात आले. परंतु त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. याविषयी ‘दमरे’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
नादुरुस्तीच्या घटना
एप्रिल ते सप्टेंबर २०१७ कालावधीत दक्षिण मध्य रेल्वेच्या संपूर्ण झोनमध्ये ६० डिझेल इंजिन नादुरुस्तीच्या घटना घडल्या. दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन २८ आॅक्टोबर २०१७ रोजी आसनगाव-आटगावदरम्यान नादुरुस्त झाले. तर नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसचे इंजिन १४ एप्रिल रोजी बदनापूर-जालनादरम्यान नादुरुस्त झाले आणि रेल्वेची वाहतूक दोन तास ठप्प
झाली.

Web Title: Waiting for electrification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.