दोन वर्षांपासून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; किशनचंद तनवाणींची पालकमंत्र्यांकडे जबाबदारी देण्याबाबत विचारणा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 12:57 PM2021-08-18T12:57:06+5:302021-08-18T13:01:09+5:30

Kishanchand Tanwani : शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले की त्यांना भेटतात

‘Wait and Watch’ for two years; Kishanchand Tanwani's question about giving responsibility to Guardian Minister? | दोन वर्षांपासून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; किशनचंद तनवाणींची पालकमंत्र्यांकडे जबाबदारी देण्याबाबत विचारणा ?

दोन वर्षांपासून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; किशनचंद तनवाणींची पालकमंत्र्यांकडे जबाबदारी देण्याबाबत विचारणा ?

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे

औरंगाबाद: भाजपातून शिवसेनेत आलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी ( Kishanchand Tanwani ) यांना भाजपा ( BJP ) सोडणे चांगलेच महागात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेने ( Shiv Sena ) त्यांना पक्षात प्रवेश तर दिला; मात्र दोन वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी न देताच ताटकळत ठेवले आहे. ( Kishanchand Tanwani's question about giving responsibility to Guardian Minister Subhash Desai ) ?

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) शहरात आले की त्यांना भेटतात, काही जबाबदारी देता की नाही, याची विचारणा करतात. देसाईही त्यांचा रोष थोपविण्यासाठी हो म्हणून उत्तर देतात. दोन दिवसांपूर्वी देसाई शहरात आले असताना देसाईंकडून तनवाणी यांना ‘जबाबदारी दिली जाईल’, असे उत्तर मिळाल्याचे समजते. असा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याने तनवाणी हताश झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

तनवाणी यांना महापालिकेच्या निवडणुका घोषित होतील या पार्श्वभूमीवर शिवसेनेत घेतले. १० ते १२ वॉर्डांवर त्यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचा विचार केला गेला. परंतु कोरोनामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका दीड वर्षांपासून लांबल्या आहेत. त्यामुळे पक्षातील संघटनात्मक फेरबदलही केले गेले नाहीत. तनवाणी यांना शिवसेनेत घेताना महानगरप्रमुखपद देण्याबाबत ठरल्याची चर्चा आहे. परंतु त्या पदावरही त्यांना नियुक्ती दिली गेली नाही. मात्र त्यांना महानगरप्रमुखपद नको असल्याचे मध्यंतरी बोलले गेले. मागील वर्षी किमान पक्ष कार्यक्रमाचे निरोप तनवाणी यांच्यापर्यंत दिले जात होते. आता गटबाजीमुळे त्यांना निरोपही बंद झाले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीपेक्षा भाजपा बरे होेते, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.

मनपाच्या निवडणुकांची वाट पाहत आहेत
पालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. परंतु ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे हे काही तनवाणी यांना समजण्यास तयार नाही. दोन ते चार वेळा मुंबई वाऱ्या केल्या, परंतु तेथेही काही हाती न लागल्यामुळे तनवाणींसह त्यांचे समर्थक आत्मचिंतन करीत असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या निवडणुका केव्हा लागतात, याची तनवाणी व समर्थक वाट पाहू लागले आहेत. दरम्यान, याप्रकरणी तनवाणी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यासंदर्भात बोलणे टाळले.

Web Title: ‘Wait and Watch’ for two years; Kishanchand Tanwani's question about giving responsibility to Guardian Minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.