वडगावात चोरट्यांनी बंद घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:02 IST2021-07-29T04:02:56+5:302021-07-29T04:02:56+5:30

: तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व एलईडी लांबविला वाळूज महानगर : धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे वडगाव कोल्हाटीतील ...

In Wadgaon, thieves broke into a closed house | वडगावात चोरट्यांनी बंद घर फोडले

वडगावात चोरट्यांनी बंद घर फोडले

: तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व एलईडी लांबविला

वाळूज महानगर : धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे वडगाव कोल्हाटीतील कुलूप बंद घर शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडले. तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, एलईडी टीव्ही, चांदीचे जोडवे, साखळी असा जवळपास ५० हजाराचा ऐवज चोरट्यांनी कपाटातून लांबविला.

सोमीनाथ प्रल्हाद कटारे हे पत्नी राणी, मुली इंद्रायणी व समीक्षा यांच्यासह वडगावातील गट नंबर ६ मध्ये राहतात. कटारे यांच्या सासऱ्याचे महिनाभरापूर्वी निधन झाल्याने त्यांच्या धार्मिक विधीसाठी कटारे कुटुंबीय आठवडाभरापूर्वी गावी गेले होते. कटारे यांचे शेजारी शिवाजी सोनवणे यांना रविवारी (दि.२५) कटारे यांच्या घराचा कडी-कोंडा उचकटलेला दिसला. सोनवणे यांनी कटारे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. कटारे हे रात्री ९.३० वाजता घरी परतले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कटारे यांनी कपाट उघडून पाहिले असता त्यांना डब्यात ठेवलेले पत्नीचे २९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ४८ ग्रॅम वजनाची चांदीची चैन व जोडवे व एलईडी टीव्ही गायब असल्याचे दिसले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कटारे यांंनी ४९ हजार ३९३ रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याची तक्रार दिली. उपनिरीक्षक गौतम खंडागळे पुढील तपास करीत आहेत.

-------------------------

Web Title: In Wadgaon, thieves broke into a closed house