प. पू. राजश्री राजरत्नश्रीजी यांच्या चातुर्मासाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:01+5:302021-02-05T04:18:01+5:30

औरंगाबाद जैन श्वेतांबर मूर्तिपूजक श्री संघाच्या बांबू गल्ली, जाधवमंडी येथील विमलनाथ जैन मंदिरात होईल, अशी घोषणा नाशिक जवळील विल्होळी ...

W. E. Announcement of Chaturmasa of Rajshri Rajaratnashriji | प. पू. राजश्री राजरत्नश्रीजी यांच्या चातुर्मासाची घोषणा

प. पू. राजश्री राजरत्नश्रीजी यांच्या चातुर्मासाची घोषणा

औरंगाबाद जैन श्वेतांबर मूर्तिपूजक श्री संघाच्या बांबू गल्ली, जाधवमंडी येथील विमलनाथ जैन मंदिरात होईल, अशी घोषणा नाशिक जवळील विल्होळी येथील तीर्थस्थानावर करण्यात आली.

प. पू. आचार्य भगवंत जगवल्लभ सुरीश्वरजी म. सा., प. पू. आचार्य भगवंत चारित्र्यवल्लभसुरीश्वरजी म. सा. व प. पू. आचार्य भगवंत अभयशेखरसुरीश्वरजी म.सा. यांच्यासमोर श्री संघाने आगामी चातुर्मास २०२१ साठी साध्वीजी भगवंतसाठी आचार्य भगवंतांसमोर विनंती केली. त्यानुसार आचार्य भगवंतांनी आगामी २०२१ च्या चातुर्मासासाठी विमलनाथ जैन मंदिरात प. पू. साध्वीजी भगवंत राजश्री राजरत्नश्रीजी म. सा. आदी ठाणा १४ यामध्ये प. पू. साध्वीश्री सुधर्मानिधी, रत्ननिधी, अक्षयनिधी, रिध्दीश्रीजी, विनितनिधी, पुणितश्रीजी, वैराग्यनिधी, अर्हमनिधी, वात्सल्यनिधी, लक्ष्यग्नेयनिधी, विश्वग्नेयनिधी, तात्वीकनिधी, तन्मयनिधी या साध्वींचा चातुर्मास औरंगाबाद शहरात होणार असल्याची घोषणा केली.

औरंगाबाद येथे बऱ्याच वर्षांनंतर साध्वीजी भगवंतांचा एकत्रितपणे एवढा मोठा चातुर्मास होत आहे. चातुर्मासामध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संघाचे अध्यक्ष अनिलकुमार संचेती यांनी केले. प. पू. आचार्य भगवंतांवर बोधी सुरीश्वरजी म. सा. यांनी विशेष मार्गदर्शन केले. या घोषणेमुळे औरंगाबाद शहरातील भाविक आनंदून गेले आहेत. यावेळी विजयराज संघवी, रुपराज सुराणा, पोपट जैन, मदनलाल जैन, अभय बोरा, दिलीप संचेती, संजय संचेती, प्रकाश जैन, आनंद चोरडिया, अजित चंडालिया, निलेश जैन, किशोर दलाल, प्रसन्ना जैन, वंदना चोरडीया, संगीता संचेती, पिंकी जैन, ममता मुथा, बबिताबेन जैन, अर्चना चोरडीया, मंगला कोठारी, लता बोरा, सुरेखा लोढा, स्मिता पारीख, कल्पना डुंगरवाल, प्रभा मुथा, प्रीती चंडालीया, आरती बोरा, प्रिया चोरडीया यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

फोटो ओळ :

प.पू.राजश्री राजरत्नश्रीजी म.सा. यांच्या २०२१ च्या चातुर्मासाची घोषणा करताना आचार्य भगवंत.

Web Title: W. E. Announcement of Chaturmasa of Rajshri Rajaratnashriji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.