सभापतीपदी व्यंकट पाटील
By Admin | Updated: May 31, 2016 00:29 IST2016-05-31T00:26:35+5:302016-05-31T00:29:47+5:30
उस्मानाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्यंकट पाटील यांची तर उपसभापतीपदी युवराज शिंदे

सभापतीपदी व्यंकट पाटील
उस्मानाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्यंकट पाटील यांची तर उपसभापतीपदी युवराज शिंदे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली़ निवडीनंतर समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला़
उस्मानाबाद बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरूध्द काँग्रेस-शिवसेना-भाजपाने एकत्रित मोट बांधून निवडणुकीत उडी घेतली होती़ १८ संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांना धूळ चारत १५ जागांवर विजय मिळविला होता़ तर विरोधकांच्या पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते़ त्यानंतर सभापतीपदासाठी निवडणूक विभागाने सोमवारी विशेष सभा बोलाविली होती़ सभापतीपदासाठी शाम जाधव आणि व्यंकट पाटील या दोघांची नावे आघाडीवर होती़ सोमवारी पिठासन अधिकारी बी़एऩशिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभापतीपदासाठी व्यंकट पाटील तर उपसभापतीपदासाठी युवराज शिंदे यांचे एकमेव अर्ज आले़ त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केलया. यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली़ या निवडीनंतर नूतन सभापती, उपसभापतींचा माजी खा़ डॉ़ पद्मसिंह पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी संचालक अरूण वीर, गफार काझी, नेताजी पाटील, राहूल पाटील आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)