बजाज आॅटो कामगारांचे उत्साहात मतदान
By Admin | Updated: November 7, 2016 01:06 IST2016-11-07T00:37:14+5:302016-11-07T01:06:42+5:30
औरंगाबाद : बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनचे २७ प्रतिनिधी निवडण्यासाठी कामगारांनी रविवारी उत्साहात मतदान केले. २७ जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात होते.

बजाज आॅटो कामगारांचे उत्साहात मतदान
औरंगाबाद : बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनचे २७ प्रतिनिधी निवडण्यासाठी कामगारांनी रविवारी उत्साहात मतदान केले. २७ जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात होते. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरूहोती.
मराठवाड्यातील सर्वात मोठा औद्योगिक प्रकल्प असणाऱ्या वाळूज येथील बजाज आॅटो लिमिटेडमध्ये एम्प्लॉईज युनियन ही कामगारांची सर्वात मोठी अंतर्गत संघटना आहे.
२,७०० कामगार या संघटनेचे प्रतिनिधी असून, इतर कामगार अन्य संघटनांशी संबंधित आहेत. एम्प्लॉईज युनियनचे प्रतिनिधी निवडण्यासाठी दर साडेतीन वर्षांनी निवडणूक होते. एम्प्लॉईज युनियनसाठी निवडून आलेल्या २७ प्रतिनिधींमधून ९ जणांची कार्यकारिणी निवडण्यात येते.
वेतनवाढीबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे अधिकार या कार्यकारिणीस असतात, त्यामुळे बजाज आॅटोच्या कामगारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. पाटीदार भवनात रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची मुदत संपुष्टात आली.
९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. विठ्ठल कांबळे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम बघितले.