शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

स्वेच्छा मरणाला परवानगी द्या; एसटी कर्मचार्‍यांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 6:19 PM

राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्या किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे साकडे कन्नड आगारातील ११२ कर्मचार्‍यांनी व सिल्लोडमधील एका कर्मचार्‍याने मुख्यमंत्र्यांना घातले आहे.

औरंगाबाद : मागण्यांसंदर्भात वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एक तर एस. टी. महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्या किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे साकडे कन्नड आगारातील ११२ कर्मचार्‍यांनी व सिल्लोडमधील एका कर्मचार्‍याने मुख्यमंत्र्यांना घातले आहे.

कन्नड येथील वाहतूक नियंत्रक संतोष बैरागी, चालक देवीदास शिरसे व वाहक गणेश खंडागळे यांनी सांगितले की, एस. टी. महामंडळात मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच इतर प्रकारे होणार्‍या त्रासामुळे काही कर्मचार्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करू शकत नाही. 

आता मानसिक व सरकारकडून होणार्‍या आर्थिक पिळवणुकीला वैतागल्याने एकतर एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी देऊन आर्थिक, मानसिक त्रासातून मुक्त करून जीवदान द्यावे नसता स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

सिल्लोडच्या कारकूनाने दिले निवेदन

दरम्यान, सिल्लोड आगारातील कारकुनानेही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. सोमेश तेजराव सपकाळ (२५) असे या कारकुनाचे नाव आहे.   एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीनीकरण करावे, सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन श्रेणी द्यावी, आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्ती द्यावी, आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर किमान मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे लेखी पत्र या कर्मचार्‍याने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. सदर कर्मचारी हा अनुकंपावर लागलेला आहे. घरची परिस्थिती बिकट आहे.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारीChief Ministerमुख्यमंत्री