शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यकर्मच शेवटपर्यंत आपल्या सोबत राहील

By admin | Updated: July 31, 2014 01:26 IST

औरंगाबाद : प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये सत्कर्मांना, धर्माच्या कामाला, पुण्य संचयाला आपल्या कार्यात शेवटचा क्रमांक देतात.

औरंगाबाद : प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये सत्कर्मांना, धर्माच्या कामाला, पुण्य संचयाला आपल्या कार्यात शेवटचा क्रमांक देतात. वास्तविक सक्षम आहात तोवरच तुमच्या हातून पुण्यकर्म, सत्कर्म होतील. ही सत्कर्मेही तुम्ही तुमच्या कल्याणासाठीच करता; परंतु तुमच्या मनात आपण कुणावर तरी उपकार करीत असल्याची भावना असते. क्षमता आहे तोवर पुण्यसंचय करा, चांगली कर्मे करा. आज आपल्याकडील सत्ता, सौंदर्य, पैसा, ऐश्वर्य हे सारे आपली कमाई नाही. त्यात अनेकांच्या पुण्याचा वाटा आहे. आपण केलेल्या पुण्यकर्माचे धनच शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहील हे लक्षात ठेवा.आम्ही सुखात असतो तेव्हा आम्हाला देव आठवत नाही, आम्हाला चांगली कामे करण्यास फुरसत नसते आणि आम्ही दु:खात, कष्टात असल्यावर आमच्याकडून काही होत नाही. ही परिस्थिती योग्य नाही. दु:खात असताना भलेही धर्म करू नका; पण सुखात असताना उन्मादामध्ये आमच्या हातून पाप तरी होणार नाही याची काळजी घ्या. सक्षम असताना तुमच्याकडे सगळीच अनुकूलता असते. डोळे चांगले आहेत तर चांगले बघा, चांगले शरीर आहे तर सत्कर्म करा, चांगला मेंदू आहे तर सत्कर्माचा विचार करा. सुखाचा सदुपयोग करा म्हणजे दु:ख येईल तेव्हा आपली समाधी अवस्था कायम राहू शकेल. अक्षम होता, वृद्ध होता तेव्हा आपली कर्मे आपल्यासमोर उभी राहतात. आपण जोपर्यंत या जमिनीशी जोडलेलो असतो, तोपर्यंतच कोणताही ऋतू असला तरी त्यावर पाने, फळे येण्याची शक्यता असते, त्यामुळे जमीन कधी सोडू नका, एकदा का तुमची जमीन सुटली की, तुमचा जीवनवृक्ष सुकायला वेळ लागणार आहे. सत्कर्माची, धर्माची, चांगल्या कर्माची भूमी कधीही सोडू नका. त्यात कमी-जास्त होईल; परंतु ते कायम ठेवा.