हार्टफुलनेस संस्थाततर्फे आजपासून व्हर्चुअल उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:05 IST2020-12-31T04:05:41+5:302020-12-31T04:05:41+5:30
औरंगाबाद : नवं आशा आणि परिवर्तनाचे युग अशा दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने ३१ डिसेंबर ते ...

हार्टफुलनेस संस्थाततर्फे आजपासून व्हर्चुअल उपक्रम
औरंगाबाद : नवं आशा आणि परिवर्तनाचे युग अशा दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान व्हर्चुअल उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्था १३० देशात ध्यान- धारणा, योगाचा प्रचार- प्रसार करीत आहे. २०२१ च्या प्रारंभी, पुनर्रचना, पुनरुत्साह, हृदयाशी पुनर्भेट या कार्यक्रमाने लोकांमध्ये स्फूर्ती भरण्याचा हार्टफुलनेसचा मानस आहे.
यासाठी तीन दिवसीय व्हर्च्युअल उपक्रम घेण्यात येत आहे.
हार्टफुलनेसचे मार्गदर्शक दाजी, योगशिक्षक बाबा रामदेव, भगिनी बी.के. शिवानी आणि गौर गोपाल दास हे लोकांसोबत संवाद साधणार आहे. या उपक्रमाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक शेखर कपूर करतील.
व्हर्च्युअल उपक्रम http://heartfulness.org/refresh2021 येथे आणि हार्टफुलनेस यूट्यूब चॅनेल http://hfn.link/refresh2021 वर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता प्रत्यक्षात पाहता येणार आहे.
३१ डिसेंबर रोजी ध्यान आणि योगाच्या सरावाने लवचिकता कशी वाढवायची याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०२१ रोजी पुनरुज्जीवनासाठी भूतकाळ मागे सोडून देण्याचे महत्त्व यावर माहिती आणि २ रोजी आंतरिक साधनाद्वारे रूपांतर घडवून आणण्यास मदत करणे यावर मार्गदशक संवाद साधणार आहेत. या व्हर्चुअल उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.