महाशिवरात्री यात्रोत्सवासाठी वेरूळनगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:54 IST2018-02-12T00:54:07+5:302018-02-12T00:54:12+5:30

महाशिवरात्री यात्रोत्सवासाठी वेरुळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर देवस्थान सज्ज झाले असून देशभरातून येणाºया भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. १३ फेब्रुवारीपासून महाशिवरात्री यात्रोत्सवास येथे प्रारंभ होत आहे.

 Virelnagari ready for Mahashivaratri yatra | महाशिवरात्री यात्रोत्सवासाठी वेरूळनगरी सज्ज

महाशिवरात्री यात्रोत्सवासाठी वेरूळनगरी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
वेरुळ : महाशिवरात्री यात्रोत्सवासाठी वेरुळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर देवस्थान सज्ज झाले असून देशभरातून येणाºया भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. १३ फेब्रुवारीपासून महाशिवरात्री यात्रोत्सवास येथे प्रारंभ होत आहे.
यात्रा महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी श्री घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट, प्रशासन व लोकप्रतिनिधींची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेरुळ परिसरातील ग्रामस्थांना पहाटे ३ ते ७ वाजेच्या दरम्यान आधार कार्ड दाखवून थेट मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी सांगितले.
तसेच भविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांना सुलभतेने दर्शन घेता यावे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, पार्र्कींग, प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी. बससेवा, पोलीस प्रशासन, भारतीय पुरातत्व विभाग, महसूल विभाग, वन विभाग, अग्निशामक दल, वेरुळ ग्रामपंचायत आदींची बैठक उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, तहसीलदार डॉ. अरुण जºहाड, सरपंच साहेबसिंग गुमलाडू , पो.नि.एकनाथ पाटील, पुरातत्व विभागाचे राजेश वाकलेकर, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दिपक शुक्ला, विश्वस्त कमलाकर विटेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेशनाना ठाकरे, इमराण पठाण, अल्लाउद्दीन, गणेश हजारी, महावितरणचे सचिन जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, ग्रामसेवक आसाराम बनसोड, विजय भालेराव, विजय राठोड, तलाठी नामदेव कुसुनरे, प्रकाश पाटील, शाम शेवाळे, कारभारी धिवरे, मकरंद आपटे, आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड, वाहक घनशाम म्हस्के, वाहतूक नियंत्रक रियाझ खान व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
च्१३ व १४ फेब्रुवारी रोजी या दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली असून त्यास पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून दौलताबाद टी पॉइंट-कसाबखेडा फाटा-वेरुळ भोसले चौक वाहतूक वळविण्यात आली आहे. तरी महाशिवरात्रीदरम्यान या पर्यायी महामार्गाचा उपयोग करावा, असे आवाहन खुलताबादचे सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील यांनी केले आहे.
दूषित पाणीपुरवठा थांबवा, अन्यथा कारवाई
च्तहसीलदार डॉ. अरुण जºहाड यांनी सांगितले की, सद्य:स्थितीला वेरुळ गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये सुधारणा न झाल्यास अन्न व भेसळ विभागामार्फत जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

Web Title:  Virelnagari ready for Mahashivaratri yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.