कामगार करारतरतुदीचा भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:16+5:302020-12-17T04:29:16+5:30
औरंगाबाद : अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वेच्छा सेवानिवृत्ती देण्याची बाब ही धोरणात्मक स्वरुपाची आहे. धोरणात्मक स्वरुपाच्या मागणीवर बदल करण्यापूर्वी मान्यताप्राप्त संघटनेसोबत चर्चा ...

कामगार करारतरतुदीचा भंग
औरंगाबाद : अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वेच्छा सेवानिवृत्ती देण्याची बाब ही धोरणात्मक स्वरुपाची आहे. धोरणात्मक स्वरुपाच्या मागणीवर बदल करण्यापूर्वी मान्यताप्राप्त संघटनेसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. परंतु, तशी चर्चा झाली नाही. त्यामुळे कामगार करारतरतुदीचा भंग झाल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपार्ट कामगार संघटनेने एका निवेदनाद्वारे केला आहे.
प्रवाशांना धुराचा त्रास
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात रोज कचरा जाळण्याचा प्रकार सुरुच आहे. त्यामुळे प्रवाशांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे एसटी महामंडळाने लक्ष देऊ हा प्रकार बंद करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
एसटी कार्यशाळेच्या इमारतीची दुरवस्था
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील इमारतीची दुरवस्था झाली आहे; परंतु इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे कानाडोळा केला जात आहे. जागोजागी झाडेझुडपे वाढली आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी कामगारांतून होत आहे.