उमरी : माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या अमृत महोत्सवी सप्ताहनिमित्ताने उमरीच्या मोंढा मैदानावर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, चेअरमन, सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक आदी गावपातळीवर कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला़ सध्याच्या दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी हिंमतीने पुढे येण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला़ माजी आ़बापूसाहेब गोरठेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष राजेश देशमुख तळेगावकर, विश्वनाथराव बन्नाळीकर, शिरीषराव गोरठेकर, मारोतराव कवळे, उपनगराध्यक्ष प्रवीण सारडा, भास्करराव भिलवंडे, शिवाजीराव देशमुख, राजेश्वर वंगलवार, रमेश सरोदे, गणेशराव गाढे, पांडुरंग देशमुख गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ जिल्हा बँकेबाबत गोरठेकर म्हणाले, नांदेड जिल्हा बँकेत अवाजवी खर्चाला आपण कात्री लावली़ बँकेची गाडी-घोडी बंद केली़ २०० कोटी रुपये बिगर शेतीमध्ये गुुंतले, कलंबर, गोदावरी मनार या साखर कारखान्यांचे दोनदा टेंडर काढले़ हा निर्णय कुणास वाटत असला तरी आपल्याला पर्वा नाही़ केवळ बँकेचे हित आपण पाहणाऱ आठ दिवसांत ४ कोटी जमा झाले़ बँकेबद्दल विश्वास ठेवा़ आपण अध्यक्षपदावर असेपर्यंत ग्राहकांच्या डिपॉझीटला हात लावू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी गोरठेकरांनी दिली़ नवीन पदाधिकाऱ्यांनी गावातएकत्र येवून दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न करावा, पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी यावेळी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत जि़प़ सदस्य कवळे यांनी व्यक्त केले़ यावेळी विश्वनाथराव बन्नाळीकर, गणेशराव गाढे यांचीही भाषणे झाली़ कार्यक्रमास मख़ाजा, सचिन बेंद्रीकर, मनोहर रातोळीकर, शंकर पाटील बाळापूरकर, दत्ताहरी पाटील चोळाखेकर, सदाशिव पुप्पुलवाड, रवि शेट्टी, जगनराव शेळके, नगरसेविका प्रेमलता अग्रवाल, दिपाली मामीडवार, सुनंदा होनशेट्टे, मिरा ढगे, शकुंतला मुदीराज, वंदना शेळके, सुनिता पोटपेलवार, वंदना सवई, फहीयानाज अब्दुल समद, डॉ़विक्रम देशमुख, सुभाषराव गोरठेकर, प्रभाकर पुय्यड, धोंडजी पाटील कवळे, कृष्णा बोईवार उपस्थित होते.(वार्ताहर)
गावपुढाऱ्यांना दुष्काळावर मात करण्याचा कानमंत्र
By admin | Updated: December 17, 2015 00:20 IST