सीए उत्तीर्ण रोहिणीचा गावकऱ्यांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:06 IST2021-09-18T04:06:09+5:302021-09-18T04:06:09+5:30

गल्ले बोरगाव : औरंगाबाद येथील रोहिणी राजेंद्र डावखर हिने नुकतीच सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यानिमित्त गल्ले बोरगावच्या ग्रामस्थांनी ...

Villagers felicitate Rohini who passed CA. | सीए उत्तीर्ण रोहिणीचा गावकऱ्यांकडून सत्कार

सीए उत्तीर्ण रोहिणीचा गावकऱ्यांकडून सत्कार

गल्ले बोरगाव : औरंगाबाद येथील रोहिणी राजेंद्र डावखर हिने नुकतीच सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यानिमित्त गल्ले बोरगावच्या ग्रामस्थांनी रोहिणीचा सार्वजनिक सत्कार केला.

या सत्काराला उत्तर देताना रोहिणी डावखर म्हणाली की, माझ्यासारख्या सामान्य मुलीला सीए सारख्या खडतर व अवघड परीक्षेत यश मिळवणे सोपे नव्हते. मात्र, वेळेचे योग्य नियोजन, ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी घेतलेले कष्ट व योग्य मार्गदर्शन यामुळे मी या परीक्षेत यश मिळवू शकले. यशाचे श्रेय तिने आई, वडील व गुरुजनांना दिले. याप्रसंगी सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, विलास सुरासे, व्हाइस चेअरमन दिलीप बेडवाल, कृउबाचे संचालक नानासाहेब चंद्रटिके, गुलाबराव सुरासे, राजेंद्र डावखर, बाबासाहेब चंद्रटिके, नारायण बर्डे, संजय ठेंगडे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

फोटो :

170921\1643-img-20210917-wa0061.jpg

सीए उत्तीर्ण रोहिणी डावखर

Web Title: Villagers felicitate Rohini who passed CA.