शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक निलंबित

By admin | Updated: July 31, 2014 00:45 IST

उस्मानाबाद : कामामध्ये अनियमितता, निष्काळजीपणा करणे, अनधिकृतपणे गैरहजर राहणे, अभिलेखे वेळेवर सादर न करणे, बैठकास गैरहजर राहणे आदी कारणांवरुन

उस्मानाबाद : कामामध्ये अनियमितता, निष्काळजीपणा करणे, अनधिकृतपणे गैरहजर राहणे, अभिलेखे वेळेवर सादर न करणे, बैठकास गैरहजर राहणे आदी कारणांवरुन ग्रामविस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर अन्य एका ग्रामसेवकाची वेतनवाढ रोखण्यात आली. ही कार्यवाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या आदेशावरुन उस्मानाबाद पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांनी केली आहे.जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या येडशी ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी एस.एस. भुसे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लेखा परीक्षणासाठी आवश्यक दस्तावेज वेळेवर सादर केले नाहीत. तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजात अक्षम्य अनियमितता केल्याचेही समोर आले होते. वेळोवेळी सूचना देऊनही ते पाक्षिक बैठकीस गैरहजर राहत असत. त्याचप्रमाणे सज्जावरही अनधिकृतपणे गैरहजर राहत होते. बहुतांश अभिलेखे अद्यावत ठेवली नव्हती. आदी बाबींचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याबाबत वारंवार सूचना करुनही त्यांच्यामध्ये सुधारणा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी भुसे यांच्याविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पं.स. गटविकास अधिकाऱ्यांनी भुसे यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, भंडारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्र्रामसेविका एस.व्ही. गायकवाड यांच्यावरही अभिलेखे अद्यावत न ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजात त्यांच्याकडून अक्षम्य अनियमितता केल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच गायकवाड या मासिक आणि पाक्षिक बैठकाशी गैरहजर राहत होत्या. या सर्व कारणांवरुन त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करुन निलंबित केले आहे. सदरील कारवाईही गटविकास अधिकाऱ्यांनीच केली आहे. या कारवाईमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)वर्षभरासाठी वेतनवाढ रोखली मेंडसिंगा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एन.पी. काकडे यांच्यावरही कामामध्ये निष्काळजीपणा केला जात असल्याचा ठपका ठेवला जात आहे. या प्रकरणी त्यांना समज देऊन वर्षभरासाठी वेतनवाढ रोखण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.