कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपी विक्रमसिंह चौहान यांचा राजीनामा

By Admin | Updated: February 9, 2016 00:27 IST2016-02-08T23:52:47+5:302016-02-09T00:27:25+5:30

लातूर : बहुचर्चित कल्पना गिरी बलात्कार व खून प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विक्रमसिंह चौहान यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे.

Vikram Singh Chauhan, accused in Kalpana murder case, resigns | कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपी विक्रमसिंह चौहान यांचा राजीनामा

कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपी विक्रमसिंह चौहान यांचा राजीनामा


लातूर : बहुचर्चित कल्पना गिरी बलात्कार व खून प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विक्रमसिंह चौहान यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्या व शहर काँग्रेस विधानसभा मतदारसंघाच्या सचिव कल्पना गिरी (३०) यांचा बलात्कार करुन खून करण्यात आला. शेवटी कल्पना गिरी यांचा तुळजापूरनजीक पाचुंदा तलावात २३ मार्च २०१४ रोजी मृतदेह आढळून आला. या प्रकरणी महेंद्र चौहान, नुरमियाँ किल्लारीकर यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पुढे तपासात विक्रमसिंह चौहान आणि कुलदिपसिंग ठाकूर यांनाही अटक केली. तेंव्हापासून विक्रमसिंह चौहान हे तुरुंगात आहेत. त्यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अलिकडे याच खटल्यातील अटकेत असलेल्या कुलदिपसिंग ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे. विक्रमसिंह चौहान यांनी बलात्कार व खून प्रकरणात आपला कुठलाही सहभाग नाही, त्यामुळे आपल्याला न्यायालयाने जामीन द्यावा, अशी याचिका आपल्या वकिलामार्फत न्यायालयात दाखल केली होती.
जिल्हा न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठात या याचिकेवर सुनावणी होऊन त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान, चौहान यांनी काँग्रेस उपाध्यक्षपदाचा व नगरसेवक पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. (प्रतिनिधी)
युवक काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना मंगल गिरी यांच्या बलात्कार व खून प्रकरणात जवळपास २१ महिन्यांपासून अटकेत असलेले तत्कालीन नगराध्यक्ष तथा महानगरपालिकेचे नगरसेवक विक्रमसिंह चौहान यांना न्यायालयाने अद्याप जामीन मंजूर केला नाही. परिणामी त्यांनी आपल्या नगरसेवकपदाचा आणि जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांचा उपाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर केला असून, नगरसेवकपदाचा राजीनामा मात्र मनपा आयुक्तांकडे पाठविला आहे. यावर मनापा आयुक्त निर्णय घेतील. गेल्या पावणेदोन वर्षापासून कल्पना गिरी खून खटल्यात विक्रमसिंह चौहान हे तुरुंगात आहेत.

Web Title: Vikram Singh Chauhan, accused in Kalpana murder case, resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.