सतर्कता अन् शौर्याने वाचले तिघींचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:17 AM2018-01-24T00:17:43+5:302018-01-24T00:18:03+5:30

सध्या स्वार्थी जगात माणसातून जिव्हाळा व आपुलकी हद्दपार झाल्याच्या रंगणाºया चर्चांना हातमाळी (ता. औरंगाबाद) व कायगाव (ता. गंगापूर) येथे सोमवारी घडलेल्या दोन घटनांनी छेद दिला. हातमाळी शिवारातून वाहणाºया दुधना नदीपात्रात पडलेल्या आपल्या पोटच्या गोळ्यास वाचविण्यासाठी आईने घेतलेली उडी आणि बुडणा-या त्या दोघी माय-लेकींना वाचविण्याचे एका शाळकरी मुलाने आपल्या जिवावर खेळून दाखवलेले धाडस, तर चौकस व सतर्क बुद्धीच्या एका व्यक्तीने कायगाव येथे गोदेत आत्मसमर्पण करण्यास आलेल्या आजीबाईला रोखून दाखवलेले भान महत्वाचे ठरले.

Vigilance and courageously read the lives of the three | सतर्कता अन् शौर्याने वाचले तिघींचे प्राण

सतर्कता अन् शौर्याने वाचले तिघींचे प्राण

googlenewsNext
ठळक मुद्देहातमाळी व कायगाव येथील घटना : गोदावरी व दुधना नदी तीरावरील प्रसंग; माणुसकीचा झरा कायम

तारेक शेख/जितेंद्र डेरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कायगाव/लाडसावंगी : सध्या स्वार्थी जगात माणसातून जिव्हाळा व आपुलकी हद्दपार झाल्याच्या रंगणाºया चर्चांना हातमाळी (ता. औरंगाबाद) व कायगाव (ता. गंगापूर) येथे सोमवारी घडलेल्या दोन घटनांनी छेद दिला. हातमाळी शिवारातून वाहणाºया दुधना नदीपात्रात पडलेल्या आपल्या पोटच्या गोळ्यास वाचविण्यासाठी आईने घेतलेली उडी आणि बुडणा-या त्या दोघी माय-लेकींना वाचविण्याचे एका शाळकरी मुलाने आपल्या जिवावर खेळून दाखवलेले धाडस, तर चौकस व सतर्क बुद्धीच्या एका व्यक्तीने कायगाव येथे गोदेत आत्मसमर्पण करण्यास आलेल्या आजीबाईला रोखून दाखवलेले भान महत्वाचे ठरले.
स्वकेंद्रित झालेल्या जगण्यावर शुष्क कोरडे ओढण्याची शहरात स्पर्धा लागते; परंतु माणुसकी अजूनही समाजात ठासून भरली आहे व त्यासाठी प्रसंगी जिवावर उदार होणारेही अजून समाजात आहेत, याची प्रचीती आकाश खिल्लारे या शाळकरी मुलाने दिली. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आकाश शाळेकडे निघाला होता. रस्त्यालगतच्या दुधना नदीपात्रात ३ वर्षांच्या मुलीसह तिची आईही डुबत असल्याचे दृश्य त्याने पाहिले व क्षणाचाही विलंब न लावता त्याने स्वत:ला नदीपात्रात अक्षरश: झोकून दिले. काही मिनिटांत त्याने दोघींनाही सुखरूप बाहेर काढले.
रेणुका गणेश म्हस्के (२२) या त्यांच्या तीन वर्षांच्या साक्षीला घेऊन धुणे धुण्यासाठी नदीवर आल्या होत्या. आई धुणे धुण्यात मग्न असताना जवळच बागडणारी साक्षी तोल जाऊन नदीपात्रात पडली. हे पाहून आईनेही तात्काळ पाण्यात उडी घेतली. पाणी खोल होते आणि तिला पोहता येत नव्हते. दोघी माय-लेकी गटांगळ्या खात असताना आकाश नेमका तेथून जात होता. पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी आईने घेतलेला निर्णय, तर दोघींना वाचविताना अकरावीत शिकणाºया आकाशने दाखविलेले धाडस अनन्यसाधारणच.

मानभंग अन् उपेक्षा...
म्हातारणात कुटुंबाकडून होणारा मानभंग व उपेक्षेने नैराश्य आलेल्या लक्ष्मीबाई कारभारी शिंदे (६५, रा. वाहेगाव, ता. गंगापूर) या सोमवारी कायगाव परिसरातील गोदावरीच्या पात्रात आत्महत्या करण्यासाठी आल्या होत्या. सायंकाळी चोहीकडे अंधार दाटून आलेला असताना या आजीबाई येथे काय करतात, असा संशय दीपक फाजगे यांना आला.
आजीबार्इंचा इरादा त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गंगापूर पोलिसांना माहिती दिली व स्वत: आजीबार्इंकडे धाव घेत त्यांचा ताबा मिळविला. तोपर्यंत नगर-औरंगाबाद महामार्गावर गस्तीवर असलेले पोलीस पथक तेथे दाखल झाले; परंतु आजीबाई ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. घरची मंडळी माझी काळजी घेत नाहीत, त्यांना मी नकोय, त्यामुळे मला जगणे नकोसे झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. पोलीस जवान एन.डी. घागरे व गणेश काथार यांनी त्यांचा मुलगा पांडुरंग शिंदे यांना बोलावून घेत कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा बडगा दाखविला. मग मात्र कुटुंबियांनी आपल्या आईला आनंदाने घरी नेले.

Web Title: Vigilance and courageously read the lives of the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.