रांगोळीतून घडविले महापुरुषांचे दर्शन
By Admin | Updated: September 8, 2014 00:51 IST2014-09-08T00:12:56+5:302014-09-08T00:51:26+5:30
जालना : परतूर येथील विद्यार्थिनी कोमल वायाळ हिने सुंदर, सुबक व अत्यंत हुबेहुब अशी महापुरुषांची रेखाटने रांगोळीतून साकारली आहेत.

रांगोळीतून घडविले महापुरुषांचे दर्शन
जालना : परतूर येथील विद्यार्थिनी कोमल वायाळ हिने सुंदर, सुबक व अत्यंत हुबेहुब अशी महापुरुषांची रेखाटने रांगोळीतून साकारली आहेत.
जालना शहरात गणेशोत्सवानिमित्त राजेंद्र प्रसाद मार्गावर कोमलचे रांगोळी प्रदर्शन भरले आहे. कोमलने इतक्या लहान वयात काढलेल्या रांगोळ्या सर्वांचा चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरत आहे.
भारतीय संस्कृतीत रांगोळीला मोठे महत्व आहे. प्रत्येक सण, उत्सवासोबतच नियमित रांगोळी काढण्याची परंपरा आहे. आज या रांगोळीस व्यापक व कलेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कोमलने सुंदर अशा रांगोळी साकारल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, संत सेवालाल महाराज, वसंतराव नाईक, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीमुक्ती चळवळ, निसर्गचित्र आदी विषयांवर रेखाटलेल्या रांगोळ्या सध्या जालनेकरांच्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
देवी- देवतांची चित्र काढताना चेहऱ्यावरील हवभाव जशास तसेच टिपण्यात आली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटलेली रांगोळी चित्र प्रदर्शनात सर्वात कालात्मक वाटते. कोमल अगदी सहज कोणतीही रांगोळी रेखाटते. कलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता कलेचा वारसा नसतानाही स्वत:च्या कठोर साधनेवर ही कला जोपासत,साकारात आहे. (प्रतिनिधी)