Video: संपकरी कर्मचाऱ्यांनी अडविली छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची वाट
By विकास राऊत | Updated: March 20, 2023 14:14 IST2023-03-20T14:14:20+5:302023-03-20T14:14:50+5:30
अद्याप सरकार कडून काही निर्णय नाही, परिणामी प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे

Video: संपकरी कर्मचाऱ्यांनी अडविली छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची वाट
छत्रपती संभाजीनगर: जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांची वाट अडविली. कार्यालय आवारात जोरदार थाळीनाद आंदोलन करून एकच मिशन,जुनी पेन्शन अशा घोषणा देऊन कार्यलय दणाणून सोडले.
आज थाळी नाद मोर्चात सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.देविदास जरारे, तलाठी महासंघ राज्य अध्यक्ष अनिल सूर्यवंशी आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी २४ तारखेला कर्मचारी कुटुंबासह मोर्चा काढण्यात येणार असून यासाठी आज बैठक झाली.