शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 18:35 IST

प्रलंबित फाईल मंजुर झाल्याशिवाय फुलंब्री पंचायत समितीमधून उठणार नाही असा पवित्रा आ हरिभाऊ बागडे यांनी घेतला आहे

फुलंब्री : येथील पंचायत समिती कार्यालयात मागील एक वर्षापासून दाखल केलेल्या सिंचन विहीर व गोठ्याच्या तब्बल ७०० फाईल धूळखात पडून आहेत. या फाईल मंजूर होत नसल्याने मेटाकुटिला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार हरिभाऊ बागडे धावून आले. आज दुपारी पंचायत समिती कार्यालयात धाव घेत आ. बागडे यांनी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना प्रलंबित फाईलबाबत जाब विचारत चांगलीच खरडपट्टी काढली. 

विहीर मंजुरीसाठी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी लाच मागितल्याने सरपंचाने पंचायत समिती कार्यालय बाहेर नोटा फेकल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर येथील कारभार चव्हाट्यावर आला. शेतकऱ्यांनी तक्रारी करत वर्क ऑर्डर आलेल्या फाईल देखील गटविकास अधिकारी अडवून ठेवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना निलंबित करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, त्या अद्यापही कर्तव्यावर आहेत. राज्यभर गाजलेले नोटांची उधळणे प्रकरण, मंत्री महाजन यांनी दखल घेऊन देखील कवडदेवी यांचा कारभार सुधारला नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला. काही शेतकऱ्यांनी याबाबत आमदार हरिभाऊ बागडे यांना तक्रार केली. आ. बागडे यांनी दखल घेत आज पंचायत समिती कार्यालय गाठले. येथे गटविकास अधिकारी कवडदेवी यांना प्रलंबित फाईलबाबत जाब विचारला, मागील तीन तासांपासून आ. बागडे यांनी येथे ठिय्या दिला आहे. 

थेट मंत्री गिरीश महाजन यांना लावला फोनसंतापलेल्या आ. बागडे यांनी थेट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना फोन लावला. गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्याबद्दल आ. बागडे यांनी मंत्री महाजन यांना माहिती दिली. त्यानंतर मंत्री महाजन यांनी जिल्हा परिषद सीईओ याना यात लक्ष घाला, असा आदेश दिल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रलंबित फाईल मंजूर झाल्याशिवाय कार्यालयातून उठणार नाही, असा पवित्रा आ. बागडे यांनी घेतल्याने जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लागली आहे.

पैसे द्या म्हणून बोर्ड लावापगार घेतात तर फाईलवर सह्या करत नाहीत, कर्तव्याचा भाग नाही का ? असा जाब आ. बागडे यांनी गटविकास अधिकारी कवडदेवी यांना विचरला. तसेच तुम्ही जाणीवपूर्वक काम करत नाहीत.  पैसे हवे असतील तर कार्यालयाबाहेर तसा बोर्ड लावा, असा संताप आ. बागडे यांनी व्यक्त केला. आ. बागडे यांचा हा अवतार पाहून जिल्हा परिषद यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाचा आमदार, माजी विधानसभा अध्यक्ष यांना कामे होत नाहींत म्हणून अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या देण्याची वेळ येत असल्याने हा विषय चर्चेचा ठरत आहे.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद