शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्यावर अव‘काळ’; आंबा, इतर फळांसह रब्बी पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:01 IST

आंबा, इतर फळांसह रब्बी पिकांचे नुकसान; परभणीत वीज पडून महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर/अकोला : मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट असताना विदर्भ- मराठवाड्याला दोन दिवसांत अवकाळी पावसाने झोडपून काढले. गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे संत्रा, लिंबू, चिकू, आंबा, केळी, पपई, टरबूज या फळपिकांसह उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी, गहू पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने संबंधित जिल्हा प्रशासनास दिले आहेत.मराठवाड्यात अनेक ठिकाणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी गारपीट झाली. जालना, बीड, लातूर जिल्ह्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. हिंगोलीत नर्सी नामदेव शिवारात झाडावरील चाळीस बगळ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.

शेळ्या चारण्यास गेल्या अन्...सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिला हरिबाई एकनाथ सुरनर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. शेळगाव येथे एका शेतकऱ्याच्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला.

विदर्भात पावसाची सर विदर्भात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही कायम होता. नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये गुरुवारीही पावसाची रिपरिप सुरू होती. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भात गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिम वऱ्हाडात  पिकांचे नुकसानपश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात ८ आणि ९ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ८० गावांना पावसाचा फटका बसला.

नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश

राज्याच्या अनेक भागांत मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्यासाह विविध फळपिकांचे नुकसान झाले असून, संबंधित जिल्हा प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन विभागाने दिले आहेत. जळगावात अनेक केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. विदर्भात नागपूर, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, भंडारा, तर मराठवाड्यात हिंगोली, उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ