दुहेरी संकटाचा बळीराजाला फेरा

By Admin | Updated: July 5, 2014 00:38 IST2014-07-05T00:09:54+5:302014-07-05T00:38:11+5:30

जळकोट : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकला असल्याचे दिसून येत आहे़

The victims of double trouble | दुहेरी संकटाचा बळीराजाला फेरा

दुहेरी संकटाचा बळीराजाला फेरा

जळकोट : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकला असल्याचे दिसून येत आहे़
जळकोट तालुका हा डोंगराळ व वाड्या-तांड्याचा असल्यामुळे तालुक्यात जनावरांची संख्या ३३ हजार ४३६ तर शेळ्या ७ हजार ८६०, मेंढ्या ७ हजार १२९ अशी एकूण ४८ हजार ३२५ आहे़ डोंगराळ तालुका असल्याने शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ दरवर्षी जुनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची हजेरी होते़ परंतु, संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने व दिवसभर उन्हाचे चटके लागल्याने संपूर्ण तालुका ओसाड पडल्यामुळे जनावरांना चारण्यासाठी हिरवळ दिसून येत नाही़ त्यामुळे शेतकऱ्याला आपली जनावरे चरावी कशी, असा प्रश्न पडला आहे़
दरवर्षी पाऊस वेळेवर पडत असल्यामुळे आपल्या जनावरांना एका वर्षासाठी लागणारा कडबा, गवत शेतकरी लावून ठेवतो़ वर्ष संपल्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडून हिरवळ होत असल्याने दरवर्षी जनावरांना शेतीत खाण्यासाठी हिरवळ असते़ परंतु, यावर्षी अचानक निसर्गाने हुलकावणी दिल्याने व गेल्या वर्षीचा साठवण असलेला चारा संपल्याने शेतकरी चांगलाच हैैराण झाला आहे़ (वार्ताहर)
पाण्यासाठी पायपीट़़़
तालुक्यात चाऱ्याची टंचाई असल्यामुळे बाहेरून कडबा आणायचा म्हटलं की १२०० रूपये शेकडा असा दर आहे़ दिवसात एका जनावराला कमीतकमी सहा ते सात पेंड्या लागतात़ त्यामुळे एका जनावराला दररोज १०० रूपये खर्च होतो़ एका शेतकऱ्याकडे किमान २ जनावरे असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे़

Web Title: The victims of double trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.