विभागीय आयुक्तांकडे, पोलीस अधीक्षकांकडे पीडितेेने संपर्क करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:51+5:302021-01-08T04:07:51+5:30
उपसभापती गोऱ्हे : शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे मदत मागण्याचे आवाहन औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मेहबूब शेख यांच्याविरुद्ध एका पीडित ...

विभागीय आयुक्तांकडे, पोलीस अधीक्षकांकडे पीडितेेने संपर्क करावा
उपसभापती गोऱ्हे : शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे मदत मागण्याचे आवाहन
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मेहबूब शेख यांच्याविरुद्ध एका पीडित तरुणीने तक्रार केली आहे. त्या पीडितेने पुढे येऊन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील किंवा शिवसेना विधानसभा संघटक राजू वैद्य यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. सोशल मीडियातून पाठविलेल्या एका व्हिडिओत गोऱ्हे यांनी म्हटले आहे, नोव्हेंबर २०२०मधील ते प्रकरण आहे. त्यामध्ये गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. ती एक पीडित तरुणी असून, तिने पत्ता चुकीचा दिला आहे. तिचा काहीच पत्ता लागत नाही. त्यामुळे प्रकरणाचा पाठपुरावा होत नाही. पोलीस अधीक्षक, विभागीय आयुक्तांना भेटणे अवघड झाले तर शिवसेना पदाधिकाऱ्यांशी पीडितेने संपर्क करावा. जर ती समोर आली तर पोलिसांना वस्तुस्थिती समजेल.
पोलिसांनी लक्ष घातले पाहिजे
या घटनेमध्ये पीडितेने ज्यावेळेला घरी येऊ नये सांगितले ते बरोबर आहे, कारण घरी पोलीस पोहोचल्यावर तक्रारदार तरुणी कोण हे समोर येते. यापूर्वी त्या पीडितेने काही तक्रारी केल्या असतील तर त्यामध्येही निष्पक्षपाती पणाने तपास होण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी निश्चितपणाने लक्ष घातलं पाहिजे, असे आवाहन उपसभापती गोऱ्हे यांनी केले आहे.