शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंनी पकडली ‘सामूहिक कॉपी’; विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 17:25 IST

या सर्व विद्यार्थ्यांचा ‘संपूर्ण परफॉर्मन्स’ रद्द करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी हे मागील काही दिवसांपासून परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन कारवाई करीत आहेत. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तब्बल नऊ परीक्षा केंद्रांना कुलगुरूंच्या पथकाने भेट दिली. त्यात पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या दोन हॉलमध्ये 'मास कॉपी' आढळून आली. या सर्व विद्यार्थ्यांचा ‘संपूर्ण परफॉर्मन्स’ रद्द करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा २९ एप्रिल तर ६ मे पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. कुलगुरू डॉ. फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेत २९ एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्रांना अचानक भेट दिली. या ठिकाणी ३६ कॉपीबहादर आढळले असून त्यांचा ‘संपूर्ण परफॉर्मन्स रद्द’ (डब्ल्यूपीसी) करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही परीक्षा केंद्रावर कुलगुरूंच्या अकस्मात भेटी देण्याचा धडाकाच सुरू आहे. चार जिल्ह्यांत ३२ परीक्षा केंद्रे आहेत. त्यासाठी ३२ भरारी पथके स्थापन केली आहेत. पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्यावर तिन्ही आठवड्यांत सुमारे ५० परीक्षा केंद्रांना कुलगुरूंनी भेट दिली. शुक्रवारी शहरातील व्ही. एन. पाटील, एम. पी. लॉ कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, राजेश टोपे फार्मसी, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, वाय. बी. चव्हाण फार्मसी महाविद्यालय अशा सात ठिकाणी भेट दिली. याठिकाणी १२ कॉपीबहाद्दर सापडले. सकाळच्या सत्रात फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या दोन हॉलमध्ये 'मास कॉपी' आढळून आल्याने येथील सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही कुलगुरूंनी परीक्षा संचालक डॉ. बी. एन. डोळे यांना दिले आहेत. या ठिकाणी दोन पोती नकला सापडल्या. खामगाव येथील गोरक्ष फार्मसी महाविद्यालयात ५ कॉपी बहाद्दरांना पकडले. त्यांचाही संपूर्ण परफॉर्मन्स रद्द होणार आहे. कुलगुरूंसोबत भरारी पथकात डॉ. सतीश दांडगे व डॉ. सचिन भुसारी होते.

पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांची खरडपट्टीपदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या काही परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे बैठक व्यवस्था नव्हती. याविषयी कुलगुरू डॉ. फुलारी यांनी संबंधित केंद्रप्रमुखाला विचारणा केली. तसेच पर्यवेक्षकांची खरडपट्टी काढली. या संदर्भात परीक्षा संचालक डॉ. डोळे यांना नियमाप्रमाणे कारवाईच्या सूचना कुलगुरूंनी केल्या आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र