शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

पशुचिकित्सकांचे असहकार आंदोलन

By admin | Updated: July 24, 2014 00:40 IST

औरंगाबाद : विविध मागण्यांसाठी पशुसंवर्धन विभागातील पशुचिकित्सकांनी गेल्या दीड महिन्यापासून राज्यस्तरीय असहकार आंदोलन पुकारले आहे.

औरंगाबाद : विविध मागण्यांसाठी पशुसंवर्धन विभागातील पशुचिकित्सकांनी गेल्या दीड महिन्यापासून राज्यस्तरीय असहकार आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात १५० व राज्यात जेमतेम ४५०० असलेल्या या पशुचिकित्सकांच्या आंदोलनाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका आंदोलकांच्या पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने घेतली आहे. दि. १० जून २०१४ पासून राज्यातील पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी गट ‘ब’ यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनादरम्यान ड्यूटीवर हजर राहून पशुंवर प्राथमिक उपचार करायचे; परंतु कामाचा अहवाल वरिष्ठांना पाठवायचा नाही. औषधी व लस स्वीकारायची नाही व पशुंना लस टोचायचीदेखील नाही. तसेच विभागाच्या सर्व योजनांवर बहिष्कार व हजेरीपटाशिवाय कोणतेच रेकॉर्ड वरिष्ठांना उपलब्ध करून द्यायचे नाही, असे आंदोलनकांनी ठरविले आहे. पावसाळ्यापूर्वी जनावरांना दिल्या जाणाऱ्या घटसर्प, फऱ्या, अंतरविषार, अशा घातक रोगांचे लसीकरण आंदोलनामुळे रखडले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेख खालेद, डॉ. एन. एच. सय्यद यांनी सांगितले की, आमच्या या सर्व मागण्यांमुळे शासनावर कोणताही आर्थिक भार पडत नाही. तरीही शासन तिकडे लक्ष देत नाही. या आहेत मागण्या-पशुधन विकास अधिकारी गट ‘ब’ सेवा भरती नियमात दुरुस्ती करावी.पशुधन विकास अधिकारी गट ‘ब’ यांची स्थाननिश्चिती करावी.ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनात प्रवासभत्ता देण्यात यावा. जिल्हा परिषदेच्या सुधारित आकृतिबंधातील तालुकास्तरीय सहायक पशुधन विकास अधिकारी हे मंजूर पद पुनर्जीवित करावे.बु्रसेल्ला लसही घातक असून, हे लसीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना गॉगल, मास्क, फुल अ‍ॅप्रोन, गमबूट आणि इतर महत्त्वाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे.