शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ भारतीय संगीतकार पद्मविभूषण इलयाराजा यांना यंदाचा पद्मपाणी पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:34 IST

अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदान

छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी पुरस्कार चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ भारतीय संगीतकार, पद्मविभूषण श्री. इलयाराजा (राज्यसभा सदस्य) यांना जाहीर करण्यात आला आहे.

याबाबतची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे. पद्मपाणि पुरस्कार निवड समितीने श्री. इलयाराजा यांची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे.

पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.   

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय चित्रपटसंगीतात सातत्यपूर्ण आणि सर्जनशील योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी ७,००० हून अधिक गाणी तसेच १,५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत  निर्मिती केली आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आदी विविध भारतीय भाषांमधील त्यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कर्नाटकी संगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व लोकसंगीताच्या बाजावर आधारलेले, तसेच पाश्चात्त्य सिम्फनीची शिस्त लाभलेले संगीत ही त्यांची प्रमुख ओळख आहे.

चित्रपटातील प्रसंगांना भावनिक खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी संगीतरचना हि इलयाराजा यांची प्रमुख ओळख आहे.  कला, करुणा आणि सर्जनशील साधनेचे प्रतीक मानल्या जाणार्‍या पद्मपाणि पुरस्कारासाठी इलयाराजा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संगीतातील आध्यात्मिकता, शिस्त आणि मानवी संवेदनशीलतेमुळे ते जनमानसात ‘इसैग्नानी’ (संगीतक्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व) म्हणून ओळखले जातात. 

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. सॉलीटेअर टॉवर्स, कालिका स्टील, डेली हंट हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. 

मराठवाड्याचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात देशभरातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, सहसंचालक जयप्रद देसाई व ज्ञानेश झोटींग, डॉ. अपर्णा कक्कड, श्वेता कागलीवाल, डॉ.आशिष गाडेकर, कला संचालक डॉ.शिव कदम, डॉ.रेखा शेळके, डॉ.प्रेरणा दळवी, शिव फाळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, सुबोध जाधव, अमित पाटील, निखील भालेराव आदींनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ilayaraja Honored with Padmapani Award at Ajanta-Ellora Film Fest

Web Summary : Veteran musician Ilayaraja receives the Padmapani Award at Ajanta-Ellora International Film Festival 2026. The award recognizes his contribution to Indian cinema and music.
टॅग्स :Chhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराज