शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती करणार विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:20 IST

या संमेलनाध्यक्षपदी यापूर्वीच मराठीतील प्रख्यात लोकसंस्कृती अभ्यासक व इतिहासकार डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड घोषित करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील आमखास मैदानावर २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठीसाहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. परदेशी म्हणाल्या की, या संमेलनाध्यक्षपदी यापूर्वीच मराठीतील प्रख्यात लोकसंस्कृती अभ्यासक व इतिहासकार डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड घोषित करण्यात आली आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक परराज्यातील व अन्य भाषांमधील साहित्यिक असणे हे विद्रोहीचे वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनासाठी डॉ. एजाज अहम, डॉ. उमा चक्रवर्ती, जयंत परमार, डॉ. असगर वजाहत, डॉ. गौहर रजा, रहेमान अब्बास आदी विचारवंत संमेलनाचे उद्घाटक म्हणून लाभले होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटन उत्तर प्रदेश येथील ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती यांच्या हस्ते होणार आहे.

साहित्यिक कंवल भारती यांचा जन्म उत्तर प्रदेशातील रामपूर येथील दलित- शोषित समाजात झाला. ते ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत, समीक्षक, अनुवादक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावावर ३२ हून अधिक ग्रंथसंपदा आहेत. त्यांनी हिंदी साहित्य जगताची व उत्तर भारतातील ब्राह्मणी संस्कृतीची चिकित्सा करणारे लेखन सातत्याने केले आहे. यानिमित्ताने त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे परदेशी यांनी सांगितले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय बालमंच, युवामंचासाठी स्वतंत्र मंच उपलब्ध असेल, असे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला किशोर ढमाले, डॉ. धोंडोपंत मानवतकर, सतीश चकोर, के. ई. हरदास, प्रा. भारत सिरसाट आणि ॲड. वैशाली डोळस, सविता अभ्यंकर आदींची उपस्थिती होती.

मूठभर धान्य आणि एक रुपयाची वर्गणीप्रा. वैशाली डोळस म्हणाल्या की, विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून एक रुपयाही घेण्यात येत नाही. या संमेलनासाठी विद्यापीठातील विविध विभागांतील लोकांकडे वर्गणी मागितली तेव्हा त्यांनी विद्रोही विचाराधारेला मदत करत नाही असे बोलून पैसे देण्यास नकार दिला. उलट शहरातील विविध वसाहतींमध्ये आम्ही मूठभर धान्य आणि एक रुपया मागितला तेव्हा घराघरांतील प्रत्येक कुटुंबाने आम्हाला मदत दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर