पहिल्याच दिवशी ९७७३ बालकांना प्रवेश

By Admin | Updated: June 16, 2017 23:23 IST2017-06-16T23:21:24+5:302017-06-16T23:23:26+5:30

हिंगोली : १५ जूनला एकूण ९७७३ बालकांना प्रवेश दिला.

On the very first day 9,773 children were admitted | पहिल्याच दिवशी ९७७३ बालकांना प्रवेश

पहिल्याच दिवशी ९७७३ बालकांना प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शाळा उघडण्यापूर्वीच जिल्हा स्तरावर याबाबत नियोजन केले होते. शिवाय प्रत्येक मूल शाळेत गेलेच पाहिजे यासाठी शहरासह ग्रामीण भागात प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. १५ जूनला एकूण ९७७३ बालकांना प्रवेश दिला.
बालकांच्या शिक्षणाचा मोफत आणि सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणीसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. १५ जूनपासून शाळा उघडण्यात आल्या. याबाबत शिक्षण विभागातर्फे पुर्वनियोजन करण्यात आले. शाळापूर्व तयारीच्या बैठकाही घेण्यात आल्या. यात जास्तीत-जास्त प्रवेशपात्र बालक शाळेत दाखल करून घेण्यास बजावले होते. शिवाय गाव, तांडा परिसरात जाऊन सर्वेक्षणही केले होते. दवंडी पिटवून पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेचे महत्त्व पटवून सांगितले जात होते. त्यामुळे यावर्षी जास्तीत-जास्त विद्यार्थीसंख्येत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जि. प. सीईओ एच. पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, दपिक चवणे, प्राचार्या जयश्री आठवले, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, एच. आर. लहाने यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच यावेळी मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

Web Title: On the very first day 9,773 children were admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.