पहिल्याच दिवशी १६५ उमेदवार अपात्र
By Admin | Updated: June 7, 2014 00:23 IST2014-06-07T00:12:50+5:302014-06-07T00:23:55+5:30
उस्मानाबाद : येथील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शुक्रवारपासून सुरू झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत पहिल्याच
पहिल्याच दिवशी १६५ उमेदवार अपात्र
उस्मानाबाद : येथील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शुक्रवारपासून सुरू झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत पहिल्याच दिवशी १६५ उमेदवार अपात्र ठरले़ पात्र ३२६ उमेदवारांची चाचणी घेण्यात आली असून, २७९ जणांनी प्रक्रियेकडेच पाठ फिरविल्याचे दिसून आले़
१४० पोलिस शिपाई पदासाठी आॅनलाईन अर्ज भरलेल्या ७५० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते़ त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासूनच मुख्यालयाच्या कवायत मैदानावर उमेदवारांनी गर्दी केली होती़ यातील १६५ उमेदवार छाती, उंची तपासणीसह मूळ कागदपत्रात अपात्र ठरले़ पात्र ठरलेल्या ३२६ उमेदवारांची लांब उडी, गोळा फेक, पुलअप्स आदी चाचण्या घेण्यात आल्या़ तर या उमेदवारांच्या शनिवारी सकाळी विमानतळाजवळील रोडवर पाच कि़मी़ धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे़ दरम्यान, पोलिस भरतीत उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले ओह. (प्रतिनिधी)
शनिवारीही ७५० उमेदवार
शनिवारी सकाळी १४१०१२७००१०२६ ते १४१०१२७००१९४७ क्रमांकापर्यंतच्या ७५० उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे़ उमेदवारांनी कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे़